१४ दिवसांत मुंबईत स्वाईन फ्लूच्या ३६ रुग्णांची नोंद

१४ दिवसांत मुंबईत स्वाईन फ्लूच्या ३६ रुग्णांची नोंद

१४ दिवसांत स्वाईन फ्लूच्या ३६ रुग्णांची नोंद

मुंबईच्या तापमानात होणाऱ्या चढउतारामुळे स्वाईन फ्लू या आजाराचा धोका वाढला असून या वर्षीचा स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेला आहे. मुंबईत शनिवारी स्वाईन फ्लू आणि लेप्टोच्या एका संशयित रुग्णाचा केईएम हॉस्पिटल्समध्ये मृत्यू झाला आहे. मुंब्र्यातील रहिवासी असलेल्या एका महिलेला श्वास घेण्यात अडचण येत होती आणि ताप येत होता. त्यामुळे तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने सावध भुमिका घेत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच आरोग्य विभागाकडूनही संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय काही न बोलण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे. तसंच, जुलै महिन्याच्या पहिल्या १४ दिवसांमध्ये स्वाईन फ्लूच्या ३६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, मुंबईकरांनो स्वाईन फ्लूपासून सावध राहा, असं आवाहन पालिकेने केलं आहे.

पहिल्या पंधरावड्यातच गॅस्ट्रोचे ४६७ रूग्ण आढळले

पालिकेच्या आकडेवारीनुसार, इतर आजारांचे प्रमाण कमी झालं असलं तरी स्वाईन फ्लू आणि हेपेटायटिसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. तसंच, पहिल्या पंधरावड्यातच गॅस्ट्रोचे ४६७ रूग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षातील ( २०१८ ) जुलै महिन्यात मुंबईत स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नव्हता. तसंच, हेपेटायटिसचे १०४ रुग्ण आढळले होते. यावर्षी, स्वाईन फ्लूचे तब्बल ३६ तर हेपेटायटिसचे १३८ रुग्ण आढळले आहेत. इतर साथीचे आजार आणि किटकजन्य आजारांची संख्या यंदा कमी असल्याचे दिसून येत आहे. तसंच डेंग्यू, लेप्टो आणि मलेरियासारखे आजार नियंत्रणात असल्याची ग्वाही आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.


वाचा – स्वाईन फ्ल्यू रुग्णांची संख्या 140 वर



यंदा पावसाळ्यापुर्वीच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून विशेष खबरदारी घेतली गेली आहे. त्यामुळे, यंदा स्वाईन फ्लू आणि हेपेटायटिसचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे.

आजार –  जुलै २०१८ – १४ तारखेपर्यंत जुलै २०१९ पर्यंत

स्वाईन फ्लू         ०                           ३६

हेपेटायटिस        १०४                         १३८

मलेरिया            ७१३                        १४६

लेप्टो                १०१                          २१

गॅस्ट्रो              १०९३                         ४६७

डेंग्यू                ५९                            ८


वाचा – महाराष्ट्राला स्वाईन फ्लूचा विळखा, नवीन वर्षात १३ मृत्यू


 

First Published on: July 15, 2019 10:22 PM
Exit mobile version