घरमहाराष्ट्रस्वाईन फ्ल्यू रुग्णांची संख्या 140 वर

स्वाईन फ्ल्यू रुग्णांची संख्या 140 वर

Subscribe

स्वाईन फ्ल्यू रुग्णांची संख्या जुलै महिन्यापर्यंत केवळ 15 होती. मात्र, त्यानंतर ऑगस्ट महिन्यात साधारण पन्नास तर सप्टेंबर महिन्यात त्याहून अधिक रुग्णांची संख्या वाढली आहे

पुणे : स्वाईन फ्ल्यू रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून ती 140 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये 61 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, यातील किती अत्यावस्थ आहेत व किती जणांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे.

स्वाईन फ्ल्यू रुग्णांची संख्या जुलै महिन्यापर्यंत केवळ 15 होती. मात्र, त्यानंतर ऑगस्ट महिन्यात साधारण पन्नास तर सप्टेंबर महिन्यात त्याहून अधिक रुग्णांची संख्या वाढली आहे. मुख्य म्हणजे पालिकेकडून प्रत्येक शाळेमध्ये स्वाईन फ्ल्यू बाबत जनजागृती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात पालिकेतील शाळांच्या शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना याबाबत शाळांमध्ये माहिती देण्यास सांगितले. त्यामुळेच याची जेवढी जनजागृती होणे अपेक्षित होते त्या प्रमाणात ती झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच शहरात दिवसागणित आठ ते दहा रुग्ण आढळून येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -