अन्यथा, दीड कोटी धनगरांचा भाजपाला धक्का – जयसिंगराव शेंडगे

मागील चार वर्षापासून धनगरांना आरक्षण देण्याचे गाजर दाखवीत सरकार गृहीत धरत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा जवळपास सुटत आला असताना अद्यापही धनगर समाज मात्र वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे धनगर समाजामध्ये संतापाची लाट असून त्याचा फटका भाजप सरकारला आगामी निवडणुकीत बसणार आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याचे सांगितले होते. या घोषणेला चार वर्षे उलटली, तरीही सरकारने धनगर आरक्षणाची मागणी पूर्ण केलेली नाही. मराठा आरक्षणाला धनगर समाजाचा विरोध नाही. मात्र, त्यांनी अडीच वर्षांपूर्वी मागणी केली असताना त्यांची मागणी आता जवळजवळ मान्य होत आहे. अन गेली ६८ वर्षे आरक्षणासाठी झगडणाऱ्या धनगर समाजाला आरक्षण देण्याची सरकारची इच्छा नाही. भाजपला देशातील दीड कोटी धनगरांमुळे सत्ता मिळाली आहे. पुढल्या वर्षी निवडणुका होणार आहेत. तेव्हा, सरकारला धनगरांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग शेंडगे यांनी दिला.

धनगरांना आरक्षण देण्याची इच्छाचं नाही

मराठा समाजाने दोन अडीच वर्षांपूर्वी आरक्षणाची मागणी केली होती. त्यांची मागणी जवळ-जवळ मान्य होत आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज आरक्षणाची मागणी करत आहे. त्यांची मागणी मान्य होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासनही दिले होते. मात्र, अद्यापही त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे धनगरांना आरक्षण देण्याची इच्छाचं नसल्याची खंत शेंडगे यांनी व्यक्त केली. धनगर साहित्य परिषदेच्यावतीने जानेवारी महिन्यात आदिवासी-धनगर साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. त्याची माहिती देण्यासाठी आज शुक्रवारी शेंडगे हे ठाण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

साताऱ्यात होणार तिसरे संमेलन

सातारातल्या म्हसवडमध्ये तिसऱ्या आदिवासी-धनगर साहित्य संमेलन १८ ते २० जानेवारी २०१९ मध्ये होणार असल्याची माहिती शेंडगे यांनी दिली. या संमेलनात समाजाचे आरक्षण, शिक्षण, साहित्य, राजकारण तसेच समाजातील महिलांच्या विकासाबाबत ठराव करून तो केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. १८ जानेवारीला सकाळी धनगरी ढोल गजरात आणि मेंढ्या शेळ्या यांच्यासह साहित्य दिंडी निघेल. त्यानंतर दहा वाजता उद्घाटन सोहळा पार पडेल. यावेळी समाजासाठी काम करणारे उद्योजक, अधिकारी, साहित्यिक यांचा गौरव केला जाईल. दोन दिवसांच्या या संमेलनात आरक्षण, समाजाचे राजकारण आणि एकीकरण यावर चर्चासत्र होईल. याशिवाय ढोल नृत्य, पोवाडे, ओव्या, वाघ्यामुरळी फड, डोंगरी नृत्य, आदी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तसेच याठिकाणी वाचकांसाठी विविध पुस्तकांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २० जानेवारीला सायंकाळी या संमेलनाचा समारोप होईल.

संमेलन अध्यक्षपदी मुरहर केळे यांची निवड

म्हसवड येथे होणाऱ्या या आदीवासी धनगर साहित्य संमेलनासाठी संमेलनाच्या अध्यक्षपदी ठाण्याचे लेखक डॉ. मुरहरी केळे यांची निवड करण्यात आली. केळे यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संतवाणी, जागी ऐसा बाप व्हावा, नाणी आदी पुस्तकांचा समावेश आहे. डॉ केळे हे मराठवाडा भूषण पुरस्कार, कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार आदी पुरस्कराने सन्मानित झालेले आहेत. त्रिपूरा राज्याच्या विद्युत विभागाचे ते व्यवस्थापकीय संचालकही आहेत. साहित्य, शासकीय, सामाजिक क्षेत्रात भरीव काय असल्याने अशा अष्टपैलू व्यक्तीची निवड साहित्य संमेलनासाठी करताना आनंद होत असल्याचे धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंगराव शेंडगे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – 

आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक

तिसर्‍या दिवशीही मराठा, धनगर आरक्षणावरून विधानसभेत गदारोळ

धनगर आरक्षण: `टीस’चा अहवाल नकारात्मक नाही

First Published on: November 23, 2018 9:59 PM
Exit mobile version