Aryan Khanचे एनसीबी कडून समुपदेशन, चांगला माणूस बनवून दाखवण्याचा दिला शब्द 

Aryan Khanचे एनसीबी कडून समुपदेशन, चांगला माणूस बनवून दाखवण्याचा दिला शब्द 

ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून (NCB) अटक करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपीचे सामाजिक संस्थेच्या मदतीने समुपदेशन करण्यात येते. क्रूझ रेव्ह पार्टी (Cruise Rev Party Case) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे देखील एनसीबी कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. शाहरुख खान (Shahrukh khan) याचा मुलगा आर्यन खानचे (Aryan Khan) देखील यावेळी समुपदेशन करण्यात आले असता त्याने एनसीबी आणि सामाजिक संस्थेला चांगला माणूस होईल तसेच सर्वाना गर्व होईल असे काम करून दाखवेल असा शब्द आर्यन खान याने दिला असल्याची खात्रीपूर्वक माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

आर्यन खान आणि त्याचासोबत आठ जणांना एनसीबीने क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. आर्यन आणि त्याच्या सोबत अटक करण्यात आलेले आठ ही जण न्यायालयीन कोठडीत आहे. अटक करण्यात आलेल्या आर्यन खान आणि इतरांचे एनसीबी कोठडीत असताना अमली पदार्थ सेवन केल्याने त्याचे स्वतावर व समाजावर होणारे दुष्परिणाम याबाबत एका सामाजिक संस्था आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी समुपदेशन केले.

आर्यन खान याला समुपदेशन करताना स्वतः एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे उपस्थित होते. सामाजिक संस्था आणि एनसीबीने आर्यन खान याचे समुपदेशन केले. यावेळी आर्यन खान हा भावुक झाला होता,  ‘मी येथून बाहेर पडल्यानंतर चांगला व्यक्ती  बनवून दाखवेल, चांगली कामे करीन, एनसीबीच्या अधिकऱ्याना गर्व वाटेल, असे काम करण्याचा प्रयत्न करेन’, असा शब्द आर्यन खान याने समुपदेशन करताना एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे आणि सामाजिक संस्थेला दिले आहे. अशी माहिती एनसीबीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

याबाबत एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी काही पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एनसीबीने अमली पदार्थ प्रकरणात अटक केलेल्या प्रत्येक आरोपीचे सामाजिक संस्थेच्या मदतीने समुपदेशन करण्यात येते, त्यांना अमली पदार्थ बाबतचे दुष्परिणाम , समाजावर होणारे परिमाण याबाबतची माहिती देवून त्यांना अमली पदार्थ सेवन करणे यापासून परावृत्त करण्यात येते. आर्यन आणि त्याच्या सोबत अटक करण्यात आलेल्याचे देखील समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली.


हेही वाचा – आर्यनला पकडणारा NCB चा साक्षीदार किरण गोसावी गायब? पुणे पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी

First Published on: October 17, 2021 1:34 PM
Exit mobile version