मुंबईच्या टोल नाक्यांवर FASTag साठी आता मासिक पासची सुविधा

मुंबईच्या टोल नाक्यांवर FASTag साठी आता मासिक पासची सुविधा

मुंबईच्या टोल नाक्यांवर FASTag साठी आता मासिक पासची सुविधा

देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर गेल्यावर्षीपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आता लहान किंवा मोठ्या वाहनांवर फास्टॅग लावणे अनिवार्य आहे. यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रवाशांच्या सोईसाठी विविध पर्याय उपलब्ध केले जात आहे. दरम्यान मुंबईतील प्रवेश नाक्यांवरील ५ टोल नाक्यावरील मासिक पास धारकांना आता २७ एप्रिलपासून फास्टॅगमध्येच मासिक पास देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी घेतला आहे.

त्यामुळे मुंबईचे प्रवेशद्वारावरील वाशी, ऐरोली, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), एलबीएस मार्ग (मुलुंड) व दहिसर या पथकर नाक्यावरुन मासिक पास घेवून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता फास्टॅगमध्येच मासिक पास काढता येणार आहे. तसेच टोल नाक्यांवर प्रत्यक्ष जावून रोख रक्कम देवून मासिक पास खरेदी करण्याच्या पध्दतीत बदल करत त्याऐवजी बँकेतून ऑनलाईन पध्दतीने पैस भरून पास काढता येण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने फास्टॅगद्वारे महिन्याचा पास घेता येईल व फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) मधून प्रवास करता येईल व वाहनधारकांना विना थांबा टोल नाका पास करता येईल. तसेच यापुढे मासिक पास फक्त फास्टॅग असलेल्या वाहनांनाच मिळणार असून ज्या वाहनधारंकाकडे अद्याप फास्टॅग नसेल त्यांनी प्रथम फास्टॅग घेणे अनिवार्य असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्ही भरू शकता FASTag मासिक पास

दरम्यान वाहनधारकां ऑनलाईन पद्धतीमध्ये 2 पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पहिला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या वेबसाईट www.nhai.org वर जाऊन तुम्ही पास काढू शकता, तर दुसरा पर्याय म्हणजे icicibankfastaglogin वरून तुम्ही मासिक पासची रक्कम बँकेत भरल्यानंतर मिळणारी पावतीवरील Authorization क्रमांक संबधित टोलनाक्यावर 3 दिवसाचा आत जावून त्यानुसार मासिक पास मिळवू शकता.
मुदतीत Activation न केल्यास पास आपोआप रद्द होवून तेवढी रक्कम वाहन धारकाचे खात्यात परत जमा होईल.

या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयसीआयसीआय बँक आणि मे. एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. (कंत्राटदार) यांच्यात करार झाला आहे. याबाबत माहिती देताना टोल प्रशासन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कमलाकर फंड यांनी सांगितले की, या सुविधेमुळे साधारणपणे 22 हजार ते 25 हजार वाहन धारकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. तसेच मुंबई पथकर नाक्यावरील गर्दीच्या वेळेची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदतच होईल. मुंबई प्रवेश द्वारावरील 4 पथकर नाक्यावर दोन्ही बाजूस फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) उपलब्ध केल्यामुळे फास्टॅग वाहनधारकाची संख्या सतत वाढत असून वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होत आहे.

राजीव गांधी सागरी सेतूवरील दोन्ही बाजुच्या सर्वच मार्गिका फास्टॅग लेनमध्ये बदलण्याचा पहिला प्रयोग 26 जानेवारीला यशस्वी झाला आहे, त्यानुसार वाशी, ऐरोली येथील पथकर नाक्यावर सर्व मार्गिका फास्टॅगमध्ये रुपांतरीत करण्याचे काम सुरु असून येत्या काही दिवसात सर्व मार्गिकामध्ये फास्टॅग यंत्रणा सुरु होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.


Coronavirus: कोरोनाचा नायनाट करु शकतो सर्दी, खोकल्याचा विषाणू- संशोधनातील दावा


 

First Published on: April 26, 2021 5:21 PM
Exit mobile version