दुर्धर आजारांवर केईएममध्ये उपचार; ‘पॅलेटिव्ह केअर’ची स्पेशल ओपीडी

दुर्धर आजारांवर केईएममध्ये उपचार; ‘पॅलेटिव्ह केअर’ची स्पेशल ओपीडी

पालिका हॉस्पिटलमधील उपकरणांना बारकोडींग

एखाद्या व्यक्तीला दुर्धर म्हणजेच कधीच बरा न होणारा आजार जडला की, त्या व्यक्तीमागे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे हाल होतात. त्या व्यक्तीच्या मागे प्रत्येकाचीच धावपळ होते. कर्करोग, टीबी, मूत्रपिंडाचे विकार असे दुर्धर आजार झालेल्या आणि शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांना मानसिक आधार मिळावा, यासाठी राज्यात पॅलेटिव्ह केअरची स्पेशल ओपीडी सुरू करण्यात आली आहे. आता अशीच सेवा मुंबईतील परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये ही सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची सुविधा सुरू करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे.

पॅलेटिव्ह केअरची ओपीडीविषयी थोडक्यात

पॅलेटिव्ह केअर अंतर्गत रुग्णाला मोफत औषधोपचारांसह त्याच्या वेदना दूर करून त्याची मानसिक स्थिती कशी चांगली राहिल? याची काळजी घेतली जाते. याशिवाय रुग्णाचे आणि कुटुंबाचे समुपदेशनही देखील केले जाते. दोन आठवड्यांपूर्वी पॅलेटिव्ह केअरची ओपीडी सुरू करण्यात आली आहे. मेडिसीन आणि प्रिव्हेंटीव्ह सोशल मेडिसीन या विभागातर्फे ही ओपीडी सध्या सुरू करण्यात आली आहे.

दोन आठवड्यांपूर्वी पॅलेटिव्ह केअरची ओपीडी सुरू करण्यात आली आहे. पॅलेटिव्ह केअरमध्ये जे आजार बरे होत नाहीत अशा रुग्णांवर उपचार आणि समुपदेशन केले जाणार आहे. गुरुवारी सकाळी ओपीडीच्या वेळेस ही सुविधा दिली जाणार आहे. जर आपातकालीन रुग्ण आलेच तर त्यांना दाखल करुन घेतले जाईल आणि त्यांच्यावर उपचार केले जातील. पॅलेटिव्ह केअरमध्ये कोणत्याही वयोगटातील हे रुग्ण असू शकतात.  – डॉ. हेमंत देशमुख, केईएमचे अधिष्ठाता


वाचा – केईएम हॉस्पिटलमध्येही आता ‘यलो फिवर’चे लसीकरण

वाचा – सफाई कर्मचारी करतात शवविच्छेदन; केईएममधला प्रकार


 

First Published on: April 17, 2019 8:45 PM
Exit mobile version