घरमुंबईकेईएम हॉस्पिटलमध्येही आता 'यलो फिवर'चे लसीकरण

केईएम हॉस्पिटलमध्येही आता ‘यलो फिवर’चे लसीकरण

Subscribe

महाराष्ट्रातील ससून हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल आणि आर्मी हॉस्पिटल या सरकारी हॉस्पिटल्सनंतर आता केईएम हॉस्पिटलमध्ये ही 'यलो फिवर' या आजाराची लस देण्यात येणार आहे.

‘यलो फिवर’ या आजारावर आता पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील ससून, जे.जे. आणि आर्मी हॉस्पिटल या सरकारी हॉस्पिटल्सनंतर आता केईएम हॉस्पिटलमध्ये ही लस देण्यात येणार आहे.
‘यलो फिवर’ हा डासांमार्फत पसरणारा आजार आहे. ‘यलो फिवर’ असलेल्या व्यक्ती किंवा माकडाला चावलेला डास दुसऱ्या व्यक्तीला चावल्यास त्यालाही ‘यलो फिवर’ होतो. या आजारावर ठोस उपचार सध्या उपलब्ध नाहीत. मात्र, लसीकरण करून या आजाराला प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे परदेशात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना हे लसीकरण केले जाते. प्रवासाच्या १० ते १४ दिवस आधी ही लस घ्यावी लागते. त्यामुळे त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि पुढील १० वर्ष त्याला या लसीकरणाचा फायदा होतो.

” २२ मार्चपासून ही लस केईएममध्ये सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातील मंगळवारी आणि गुरुवारी १.३० ते ३ च्या दरम्यान ही लस दिली जाईल. यासाठी वेगळे केंद्र सुरू करण्यात आले आहे. परदेशात राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्यांसाठी ही लस उपयुक्त ठरणार आहे. “

–डॉ. हेमंत देशमुख, केईएमचे अधिष्ठाता

या आजाराचे लक्षणे

केईएम हॉस्पिटलमध्ये ‘यलो फिवर’ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. दर मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी १.३० ते ३ वाजता हे केंद्र सुरू असणार आहे. फक्त ३०० रुपयांमध्ये ही लस मिळणार आहे. ‘यलो फिवर’ आजारात सुरुवातीला स्नायूंमध्ये वेदना (विशेषत पाठ आणि गुडघ्यात), जास्त ताप, चक्कर येणे, डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळ, थंडी वाजणे, उलटी असे लक्षणे ७ ते १० दिवस असतात. पण, त्यानंतर लक्षणे अधिक तीव्र होतात आणि ती जीवघेणी असतात. तसेच वारंवार येणारा ताप, ओटीपोटात वेदना, उलटी, उलटीतून रक्त पडणे, थकवा, कावीळ, किडनी निकामी होणे, यकृत निकामी होणे, रक्तस्राव आणि हृदयाचे अनियमित ठोके अशी तीव्र लक्षणे दिसतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -