मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची ५ वाहनांना धडक : दोनजण जखमी

मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची ५ वाहनांना धडक : दोनजण जखमी

मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची ५ वाहनांना धडक : दोनजण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर एका आयशर कंपनीच्या ट्रकने बेदरकारपणे भरधाव वेगाने वाहन चालवून ५ गाड्यांना जबरदस्त धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी आहेत. या वाहनांना धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक नागरिकांनी सदरच्या ट्रक चालकाला पाठलाग करून पकडले. मुंबई-गोवा महामार्गावर पेण वरून पनवेलच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक DD 01A 9777 ने गोविर्ले येथे ४ चार चाकी गाड्यांना जोरदार धडक दिली. यानंतर सदर ट्रक चालकाने अधिक वेगाने बेदरकारपणे गाडी चालवून पलायन करण्याचा प्रयत्न केला.

गोविर्ले येथून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर खारपाडा येथे पुढे भरधाव वेगाने जाताना एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जबर जखमी झाला. तसेच या ट्रकने गोविर्ले येथे धडक दिल्याने एका चार चाकी मधील महिला जखमी झाली आहे. या ट्रकने धडक देऊन दोघांना जखमी केले. ट्रकची धडक एवढी जबरदस्त होती की त्यामुळे चार चाकी व दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवानेे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताचे वृत्त समजताच अपघातग्रस्तांचेवाली कल्पेश ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर अपघातातील जखमींना प्राथमिकतेने मदत केली. जखमींना पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले तसेच या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकालाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.


हेही वाचा – काहीही करा पण, आम्हाला उभं करा, पूरग्रस्त महिलेचा मुख्यमंत्र्यांसमोर टाहो

First Published on: July 25, 2021 7:16 PM
Exit mobile version