राफेल नदालचा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश, प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्ह जखमी

राफेल नदालचा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश, प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्ह जखमी

प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्ह (Alexander Zverev) जखमी झाल्याने स्टार टेनिसपटू राफेल नदाल फ्रेंच ओपन 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. शुक्रवारी नदाल आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्यातील या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना अपूर्ण राहिला. सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये अलेक्झांडर झ्वेरेव्ह याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे झ्वेरेव्हला बाहेर पडावे लागले. परिणामी कोर्टवर येऊ शकला नाही. त्यामुळे फ्रेंच ओपन 2022 च्या (French Open 2022) अंतिम फेरीत (Final Match) नदालचा सामना क्रोएशियाचा मारिन सिलिक आणि नॉर्वेचा कॅस्पर रुड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे.

यंदाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवत नदालने १४ व्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. याआधी १३ अंतिम सामन्यामध्ये तो कधीही पराभूत झालेला नाही. नदालने १३ वेळा फ्रेंच ओपन जिंकली आहे. त्यानुसार, २००५ मध्ये त्याने पहिल्यांदा हे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४,२०१७, २०१८,२०१९ आणि २०२० मध्ये विजय मिळवला.


हेही वाचा – बांगलादेश संघाला मिळाला नवा कसोटी कर्णधार, पण रेकॉर्डमध्ये ठरलाय फ्लॉप; कोण आहे हा खेळाडू?

First Published on: June 4, 2022 9:56 AM
Exit mobile version