IPL Winners List: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात दोन मोठे यशस्वी संघ, जाणून घ्या कोणी आणि किती वेळा जिंकली ट्रॉफी

IPL Winners List: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात दोन मोठे यशस्वी संघ, जाणून घ्या कोणी आणि किती वेळा जिंकली ट्रॉफी

जगातील सर्वात मोठं आणि लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League). या इंडियन प्रीमियर लीगला २००८ सालापासून सुरूवात झाली. आयपीएलच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर मुंबई (MI) आणि चेन्नईचा (CSK) संघ सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा तर कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नईने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. पण आयपीएल २०२२ चा १५ वा हंगाम या दोन्ही संघांसाठी सर्वात वाईट हंगाम होता. या हंगामात मुंबई आणि चेन्नईला केवळ ४ विजय मिळाले आणि दोघांनीही ८ गुणांसह हंगामाचा शेवट केला.

आयपीएलच्या इतिहासात कोलकाताचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. या संघाने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोनदा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनीही १-१ वेळा ट्रॉफी जिंकली आहे.आयपीएलच्या पहिल्या हंगामात शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान आयपीएलचा पहिला चॅम्पियन संघ ठरला. त्यांनी अंतिम फेरीत चेन्नईचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती.

आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात डेक्कन चार्जर्स संघाने जेतेपद पटकावले होते. अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली त्यांनी आरसीबीला अंतिम फेरीत पराभूत केले होते. तिसऱ्या आणि चौथ्या हंगामात चेन्नईने वर्चस्व गाजवले होते. यामध्ये चेन्नईने तिसऱ्या हंगामात मुंबई आणि चौथ्या हंगामात आरसीबीचा पराभव केला होता.२०१२ मध्ये म्हणजेच ५ व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या रुपात आयपीएलला नवा चॅम्पियन मिळाला. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली, कोलकाताने चेन्नईला तिसऱ्या ट्रॉफीपासून रोखले आणि अंतिम फेरी जिंकून चॅम्पियन बनले. २०१३ मध्ये पहिल्यांदाच रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघाने विजेतेपद पटकावले होते. यावेळी चेन्नईचा पराभव झाला.

२०१४मध्ये कोलकाताने पुन्हा एकदा पुनरागमन करत अंतिम फेरीत पंजाबचा पराभव केला. २०१५ मध्ये मुंबईने चेन्नईला पराभूत करून दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली होती. तर २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने नवीन कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली होती. मुंबईने २०१९ आणि २०२० मध्ये एकापाठोपाठ एक विजय मिळवत ट्रॉफीची संख्या ५ वर नेली. मात्र, २०२१ मध्ये झालेल्या शेवटच्या हंगामात चेन्नईने बाजी मारली होती. त्यानंतर आज २०२२ च्या १५ व्या हंगामात नुकतच आगमन झालेल्या गुजरात टायटन्स या नवीन संघाने पहिल्यांदाच आयपीएलच्या १५ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत जेतेपद पटकावले आहे.


हेही वाचा : IPL Final 2022: गुजरात टायटन्सने पदार्पणातच आयपीएलच्या जेतेपदावर कोरले नाव


 

First Published on: May 30, 2022 9:05 AM
Exit mobile version