IPL Final 2022: गुजरात टायटन्सने पदार्पणातच आयपीएलच्या जेतेपदावर कोरले नाव

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाचे जेतेपद नवा संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Tiatans) पटकावले. अष्टपैलू व कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातच्या संघाने त्याच्याच अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सहज पराभव केला.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाचे जेतेपद नवा संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पटकावले. अष्टपैलू व कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातच्या संघाने त्याच्याच अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सहज पराभव केला. हार्दिकने गोलंदाजीत १७ धावांत विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीतही महत्त्वपूर्ण ३४ धावा केल्या. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर झालेल्या आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 131 धावांचे आव्हान गुजरातला दिले.

राजस्थानच्या 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला फारशी चांगली सुरूवात करता आली नाही. सलामीवीर वृद्धीमान साहा आणि मॅथ्यू वेड लवकर बाद झाले. त्यावेळी प्रतिस्पर्धी राजस्थानच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, कर्णधार हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांनी ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेले. ही जोडी विजेतेपदापर्यंत पोहचेल असे वाटत असताना हार्दिक पंड्या ३४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरने शुभमनच्या साथीने संघाला आयपीएलचे विजेतपद पटकावले.

हार्दिक पांड्याने 4 षटकांत 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. हार्दिकने स‌‌‌‌ॅमसन, बटलर, शिमरोन हेटमायरला या तिघांना बाद केले. साई किशोरने राजस्थानच्या आर अश्विन (6) व ट्रेंट बोल्ट (11) यांना माघारी पाठवले. राजस्थानला 9 बाद 130 धावा करता आल्या.

हेही वाचा – आयपीएल 2023मध्ये पोलार्ड मुंबईच्या संघात नसणार?, भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा म्हणतो…

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने 10 षटके झाली तरी आर अश्विनची 4 षटके राखून ठेवली होती. 12व्या षटकात अश्विन गोलंदाजीला आला. गुजरातला 54 चेंडूंत 69 धावा करायच्या होत्या. पण, हार्दिक पांड्याने अश्विनचे चौकार-षटकारांनी स्वागत करताना शुबमनसह 43 चेंडूंत 50 धावांची भागीदारी पूर्ण केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gujarat Titans (@gujarat_titans)

अश्विनच्या पहिल्याच षटकात 15 धावा आल्या. त्यामुळे चहलला पुन्हा गोलंदाजीवर आणले गेले आणि त्याने 14व्या षटकात हार्दिकला (34) माघारी पाठवले. यशस्वी जैस्वालने स्लिपमध्ये सुरेख झेल टिपला. चहलने (27) यासह पुन्हा आयपीएल 2022मध्ये पर्पल कॅप नावावर केली. चहलने 4 षटकांत 20 धावांत 1, बोल्टने 14 धावांत 1 विकेट घेतली. आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक 27 विकेट्स घेणारा चहल हा पहिलाच फिरकीपटू ठरला.

अश्विनला डेव्हिड मिलरनेही झोडून काढले. गुजरातला 24 चेंडूंत 22 धावाच करायच्या होत्या आणि त्यांच्याकडे 7 विकेट्स हाताशी होत्या. डेव्हिड मिलरने ताबडतोड फटकेबाजी करताना गुजरातचा विजय पक्का केला. गिल 45 आणि मिलर 19 चेंडूंत 35 धावांवर नाबाद राहिले. गुजरातने 7 विकेट्स व 11 चेंडू राखून 133 धावा केल्या.


हेही वाचा – Women’s T20 Challenge 2022 : व्हेलोसिटी संघाचा पराभव करत सुपरनोव्हाने पटकावले तिसरे जेतेपद