Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenAshadhi Special : यावेळी उपवासात साबुदाणा अप्पे नक्की ट्राय करा

Ashadhi Special : यावेळी उपवासात साबुदाणा अप्पे नक्की ट्राय करा

Subscribe

उपवास म्हटलं कि साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, वरीचा भात , शेंगदाण्याची आमटी आणि बटाट्याची भाजी नाहीतर शिंगाड्याचे थालीपीठ किंवा पुरी. हे ठरलेले मेनू असतात. पण आज आम्ही तुम्हांला साबुदाणा अप्पे या हटके मेनूबद्दल सांगणार आहोत.

साबुदाणा अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

- Advertisement -
  • १ वाटी साबुदाणा (भिजवलेला)
  • २ बटाटे (उकडलेले)
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • १ वाटी शेंगदाणे (भाजलेले)
  • मीठ चवीनुसार

कृती :

Sabudana Appe recipe | Diussimple kitchen recipes | Recipebook

  • सर्वात आधी भाजलेले शेंगदाण्याचे बारीक कूट करून घ्या.
  • आता एका भांड्यात साबुदाणा, बटाटा, वाटलेल्या मिरच्या, शेंगदाण्याचे कूट आणि मीठ टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
  • आता या मिश्रणाचे लहान-लहान गोळे तयार करून एका प्लेटमध्ये ठेवा.
  • आता गॅसच्या मंद आचेवर अप्पे पात्राला तेल लावून तापत ठेवा.
  • अप्पे पात्र गरम होताच साबुदाण्याचे गोळे अप्पे पात्रात ठेवून ३ ते ४ मिनिट झाकण घालून ठेवा.
  • ३ ते ४ मिनिटांनंतर झाकण काढून साबुदाणा अप्प्यांवर तेल सोडून ते दुसऱ्या बाजूला पलडी करून पुन्हा ३ ते ४ मिनिट भाजून घ्या.
  • त्यानंतर साबुदाणा अप्पे प्लेटमध्ये काढून घेऊन गरमागरम सर्व्ह करा.

हेही वाचा :

Ashadhi Special : उपवासात साबुदाण्याचे चटपटीत थालीपीठ नक्की ट्राय करा

- Advertisment -

Manini