Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthMonsoon: पावसाळ्यात बाळाची घ्या अशी काळजी

Monsoon: पावसाळ्यात बाळाची घ्या अशी काळजी

Subscribe

पावसाळाचे दिवस सर्वांनाच आवडतात. मात्र याच दरम्यान साथीचे आजार ही पसरतात. अशातच घरात जर लहान बाळ असेल तर त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण बाळांची त्वचा अगदी पातळ, नाजुक आणि संवेदनशील असते. अशातच बाळाची त्वचेसंबंधित काळजी कशी घ्याल याच बद्दलच्या खास टीप्स.

यावेळी साबण, शॅम्पू, डिटेर्जेंट, तेल, पावडर आणि कपड्यांमुळे बाळाच्या त्वचेला नुकसान पोहचू शकते. त्याचसोबत अधिक सुगंध येणारे प्रोडक्ट्स सुद्धा बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. त्वचेवर जळजळ आणि रॅशेजची समस्या उद्भवू शकते.

- Advertisement -

-डासांपासून दूर ठेवा
पावसाळ्यात डास वाढतात. अशातच ते चावल्यानंतर बाळांना स्किन संबंधित समस्या उद्भवू शकते. तसेच त्याच्या त्वचेवर लाल डाग येऊन सूज येऊ शकते. यापासून दूर राहण्यासाठी बाळासाठी मॉस्किटो नेट वापरा. बाळाच्या खोलीचे खिडकी-दरवाजे बंद करुन ठेवा. जेणेकरुन डास आतमध्ये येणार नाहीत. खासकरुन बाळांना संध्याकाळी घराबाहेर घेऊन जाऊ नका.

-अशी घाला अंघोळ
नवजात बाळ असेल तर त्याच्या पहिल्या महिन्यात आठवड्यातून 3-4 वेळा स्पंजने पुसून काढा. दूध पाजल्यानंतर त्याचे तोंड स्पंजने पुसा. डायपर बदलताना सुद्धा स्पंजने ती जागा स्वच्छ पुसा. दुसऱ्या महिन्यापासून तुम्ही जेव्हा त्याला अंघोळ घालण्यास सुरुवात कराल तेव्हा कोमट पाणी वापरा. नेहमीच अँन्टी बॅक्टेरियल सोपचा वापर करु नका. कारण बाळाची त्वचा अगदी नाजूक असते आणि याचा वापर केल्यास त्याच्या स्किनला नुकसान पोहचू शकते. अंघोळ घातल्यानंतर कॉटनच्या मऊ टॉवेलने त्याचे अंग पुसून घ्या.

- Advertisement -

-मसाज करा
बाळाची स्किन ही नाजूक असते. त्यामुळे मसाज करताना काळजी घ्या. हेल्दी बाळासाठी मसाज हा हलका करा. मसाज करताना असे तेल वापरु नका ज्यामध्ये केमिकलचा वापर केलेला असेल. सुर्यफूल किंवा बदामाचे तेल बाळासाठी वापरु शकतात.

-बाळांना घाला असे कपडे
लहान मुलांना कपडे खरेदी करताना त्यांना ते आकर्षक दिसण्याऐवजी त्यांच्या कंम्फर्टनुसार घ्या. पावसाळ्यात खासकरुन सुती कपडे बाळांना घाला. तसेच इस्लाटिक असलेले कपडे अजिबात बाळांसाठी खरेदी करु नका.

-नेजल ड्रॉप्स
पावसाळ्यात बाळाला सर्दी झाल्यास नेजल ड्रॉप्स तुमच्याकडे ठेवा. जेणेकरुन गरज भासल्यास त्याचा वापर करु शकता.

-मोजे घालणे विसरु नका
पावसाळ्यात जर गारवा अधिक वाढला तर त्यांना थंडी वाजू नये म्हणून मोजे घाला. तसेच उबदार ही कपडे तुम्ही घालू शकता.


हेही वाचा- Baby Care : बाळासाठी ‘हे’ आहेत Eco Friendly Diaper

- Advertisment -

Manini