Saturday, April 27, 2024
घरमानिनीफक्त 15 मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रवा मेदू वडा

फक्त 15 मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रवा मेदू वडा

Subscribe

तुम्ही आत्तापर्यंत उडदाच्या डाळीपासून तयार मेदू वडा खाल्ला आहे. आज आम्ही तुम्हाला रव्या पासून तयार मेदू वडा कसा करायचा हे सांगणार आहोत.

साहित्य : 

- Advertisement -
  • 1 कप रवा
  • 1 कप पाणी
  • 1/2 चमचा जिरे
  • 1/4 काळी मिरी
  • 1 चमचा तेल
  • 1 चमचा लिंबाचा रस
  • 1 (बारीक चिरलेली) हिरवी मिरची
  • 2-3 कढीपत्ता
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार तेल

कृती :

- Advertisement -
  • सर्वप्रथम मेदू वडा बनवण्यासाठी रवा शिजवून घ्या. यासाठी तुम्ही एका भांड्यात पाणी, तेल आणि मीठ एकत्र करून एक उकळी येऊ द्या.
  • पाण्याला उकळी आल्यावर त्यात रवा घाला आणि शिजवा.
  • शिजवलेला रवा एका भांड्यात काढा.
  • आता तयार रव्यात कढीपत्ता, काळी मिरी, जिरे, मिरची, हिरवी धणे आणि लिंबाचा रस मिसळा.
  • या मिश्रणाला मेदू वड्यासारखा आकार द्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात तयार वडे छान खरपूस तळून घ्या.
  • कुरकुरीत मेदू वडा नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : अवघ्या 15 मिनिटांमध्ये झटपट बनवा रवा डोसा

- Advertisment -

Manini