घरमहाराष्ट्रपत्राचाळ गैरव्यवहारातील पैशांतून 'ठाकरे' सिनेमाची निर्मिती, स्वप्ना पाटकरांचा आरोप

पत्राचाळ गैरव्यवहारातील पैशांतून ‘ठाकरे’ सिनेमाची निर्मिती, स्वप्ना पाटकरांचा आरोप

Subscribe

मुंबई – गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. आता ते ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत. दरम्यान, त्यांच्याविरोधात ईडीने चार हजारपानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच, २०१९ साली आलेल्या ठाकरे सिनेमाची निर्मितीही पत्राचाळ गैरव्यवहारातून आलेल्या पैशातून केल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केलाय.

हेही वाचा – देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी? भाजपाचा पवारांना सवाल

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा चित्रपट २०१९ साली आला होता. संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी जे पैसे कमावले तेच पैसे या चित्रपटाच्या निर्मितीकरता वापरले असल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. चाह हजारपानी पत्रात हा आरोप नमूद करण्यात आला आहे.

हेही वाचा – मुंबईतील कामासाठी चेन्नईत मुलाखती, सरकारवर आगपाखड करत आदित्य ठाकरेंनी पुरावाच सादर केला

- Advertisement -

वाधवान बंधूंशी संगनमत करून संजय राऊतांनी पैसे कमावले असा आरोप ईडीने आरोपपत्रात केला आहे. तसंच, संजय राऊतच या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आल्याचा उल्लेख या आरोपपत्रात ईडीने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -