घरमहाराष्ट्रपोलिसांना दिलासा! नैमित्तिक रजा वाढवल्या, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पोलिसांना दिलासा! नैमित्तिक रजा वाढवल्या, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Subscribe

मुंबई – राज्यातील पोलिसांसाठी शिंदे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव किंवा इतर कोणत्याही सणांदिवशी सतत कार्यरत असलेल्या पोलिसांना आता दिलासा मिळणार आहे. कारण पोलिसांच्या वार्षिक रजा वाढवून देण्यात आल्या आहेत. पोलिसांना आता एका वर्षांत २० रजा मिळणार आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच, आगामी पोलीस भरती पारदर्शकपणे व्हावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी गृहविभागाला दिल्या आहेत.

पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक वर्षात १२ ऐवजी ८ रजा मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता व त्याअनुषंगाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना १२ दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या. मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून २० दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा शिंदेंच्या कॅबिनेटने घेतले 11 महत्त्वाचे निर्णय, धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा काढणार

पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने व पारदर्शी व्हावी

- Advertisement -

७५ हजार पोलीसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावे तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सध्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परिक्षेच्या अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येईल. यासाठी मुंबईतील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करा. तसेच मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

हेही वाचा – देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी? भाजपाचा पवारांना सवाल

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -