Sunday, April 28, 2024
घरमानिनीReligiousशुभकार्यात का वापरू नये काळा रंग? 'हे' आहे कारण 

शुभकार्यात का वापरू नये काळा रंग? ‘हे’ आहे कारण 

Subscribe

रंगांचे आणि आपल्या आयुष्याचे खूप जवळचे नाते आहे. रंगाशिवाय या संपूर्ण जगाचे वर्णन करणं अशक्य आहे. हिंदू धर्मात देखील प्रत्येक रंगाचे वेगवेगळे महत्त्व सांगितले जाते. देवी-देवतांच्या पूजेत, लग्नात तसेच इतर धार्मिक कार्यांमध्ये लाल, पिवळा, केशरी रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, या कार्यक्रमांमध्ये काळा रंग वापरणं अशुभ मानलं जातं. परंतु यामागे नक्की काय कारण आहे? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हिंदू धर्मात काळ्या रंगाला शोक आणि निषेधाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पूजेमध्ये किंवा लग्नामध्ये काळा रंग वापरला जात नाही. मात्र, काही शुभ कार्य सोडल्यास काळ्या रंगाला शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. खरंतर, काळ्या रंगाला शास्त्रात विशेष महत्त्वाचे मानले जाते.

- Advertisement -

काळ्या रंगाचे महत्त्व?

Black Thread| Black धागा|Black Thread For Women | why women should wear black thread | HerZindagi

 

- Advertisement -
  • काळा रंग प्रत्येक प्रकारची नकारात्मक शक्ति खेचून घेतो. त्यामुळे आपल्याकडे लहान बाळांना काजळाचा टीळा लावला जातो. तसेच हातात किंवा पायात काळ्या रंगाचा धागा घातला जातो.
  • शनि देवांचा देखील काळा रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे शास्त्रात शनिवारी आवर्जून काळा रंग परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.
  • कालीमातेचा रंग देखील काळा आहे. असं म्हणतात, कालीमाता वाईट शक्तींचा नाश करते आणि दृष्टांचा संहार करते.
  • भगवान शंकरांच्या शिवलिंगाचा आणि श्री विष्णूंचा रंग देखील काळा आहे. याची पूजा करणं शुभ मानलं जातं.
  • शास्त्रात काळ्या रंगांच्या मुंगीला देखील शुभ मानलं जातं कारण काळी मुंगी धनलाभाचे संकेत घेऊन येते.

काळा रंग कधी वापरु नये?

Best Collections of Jewellery for Black Saree – SIA Jewellery

 

 

 

खरंतर, कोणताच रंग अशुभ नसतो. मात्र, शास्त्रातील काही निमयांप्रमाणे काळा रंग देवी-देवतांच्या पूजेदरम्यान तसेच इतर शुभकार्यांदरम्यान वापरु नये. तसेच सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी देखील काळा रंग वापरु नये.

 


हेही वाचा :

Vastu Tips : फिश एक्वेरियम कोणत्या दिशेला असावे?

- Advertisment -

Manini