घरमहाराष्ट्रPawar VS Pawar : 'माजी टीकाकार'; दादांच्या व्हिडीओ क्लिप्स पोस्ट करत शरद...

Pawar VS Pawar : ‘माजी टीकाकार’; दादांच्या व्हिडीओ क्लिप्स पोस्ट करत शरद पवार गटाचा टोला

Subscribe

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर आता येत्या 31 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीचा निकाल लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. त्यामुळे हा निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे देशाचे लक्ष लागले आहे. पण हा निकाल येण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अजित पवार यांच्यावर व्हिडीओच्या माध्यमातून निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी ‘भावी मुख्यमंत्री’ समोरच्या गर्दीत भविष्यातील मुख्यमंत्री पदाची आशा शोधताना दिसत आहेत, या आशयाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर आता अजित पवार यांच्या जुन्या भाषणातील आणि पत्रकारांशी साधलेल्या संवादातील काही क्लिप्स पोस्ट करण्यात आल्या आहेत. (Pawar VS Pawar Former Critic Sharad Pawar group posting video clips of Ajit Pawar)

हेही वाचा – PM Modi Solapur : देशात पुन्हा मोदी सरकार जगाला विश्वास, तर महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार – एकनाथ शिंदे

- Advertisement -

अजित पवार यांचा व्हिडीओ पोस्ट करताना शरद पवार गटाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द आणि आज हे ‘माजी टीकाकार’ मूग गिळून गप्प झाले आहेत. ते का आणि कशासाठी? असा सवाल करत शरद पवार गटाने म्हटले की, अजित पवार यांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर शरद पवार यांचा विश्वास तोडला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडला आहे. शब्द जपून वापरायचे असतात आणि लक्षातही ठेवायचे असतात, असा टोलाही शरद पवार गटाने लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – coaching centre guidelines : 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांचे क्लासेस बंद, 1 लाखापर्यंत दंड; मार्गदर्शकतत्त्व जाहीर

पोस्ट केलेल्या अजित पवार यांच्या व्हिडीओमध्ये काय?

शरद पवार गटाकडून पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार यांच्या जुन्या भाषणातील आणि पत्रकारांशी संवाद साधतानाच्या काही क्लिप्स आहेत. एका क्लिपमध्ये अजित पवार म्हणताना दिसत आहेत की, ‘आधीपासूनच शब्दाचा पक्का अशी माझी ओळख आहे. कुणाला दिलेला शब्द फिरवणे, कुणाला फसवणे, कुणाला खेळवत ठेवणे हे मला अजिबात जमत नाही’, असे म्हणताना दिसत आहेत. तर दुसऱ्या क्लिपमध्ये “मोदीला हटवा” असं एका भाषणात म्हणताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाबाबत अजित पवार यांनी काय भूमिका मांडली हे तिसऱ्या क्लिपमध्ये दाखवण्यात आले आहे. यात अजित पवार म्हणताना दिसतात की, ‘या पदावर आपण कामच करू शकत नाही, तो प्रश्नच येत नाही’. तर त्याच्याच पुढच्या क्लिपमध्ये सुनील तटकरे अजित पवार यांचा “आपले राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री”, असा उल्लेख करताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -