घरमहाराष्ट्रPM Modi In Solapur : सोलापुरातील कार्यक्रमात मोदींना अश्रू अनावर, भावूक होत...

PM Modi In Solapur : सोलापुरातील कार्यक्रमात मोदींना अश्रू अनावर, भावूक होत म्हणाले…

Subscribe

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरातील कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील 15 हजार घरांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामगारांचे नेतृत्त्व करणारे माजी आमदार नरसय्या आडम उपस्थित होते. यावेळी या घरात प्रवेश करणाऱ्या अनेक कुटुंबाना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते घरांच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. पंरतु, या कार्यक्रमात भाषण करत असताना पंतप्रधान भावूक झालेले पाहायला मिळाले. लहानपणी राहायला घर नव्हते, त्यामुळे हे घर पाहून हेवा वाटतो, असे सांगत असताना मोदींना अश्रु अनावर झाले. ज्यामुळे काही सेकंदासाठी थांबत मोदींना आवंढा गिळला, त्यानंतर पाण्याचा घोट घेत त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली. (PM Narendra Modi shed tears while speaking at a program in Solapur)

हेही वाचा… PM Modi in Solapur : ‘गरिबी हटाओ’च्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी साधला काँग्रेसवर निशाणा

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकले ते म्हणाले मोदींमुळे महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे. हे ऐकून तर खूप चांगले वाटले. मात्र खरे तर हे आहे की महाराष्ट्राचा गौरव वाढतो आहे, तो महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि इथल्या प्रगतीशील सरकारमुळे होतो आहे. प्रभू रामाने आम्हाला नेहमी वचनपूर्तीची शिकवण दिली आहे. मला आज खूप आनंद होतो आहे की सोलापूरमधल्या गरीबांसाठी आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकार्पण झाले आहे.

तर, मी घरांचे काम पाहिले तेव्हा वाटले मलाही लहानपणी अशा घरात राहता आले असते तर किती छान झाले असते. खरं तर ही घरे पाहून मला आज हेवा वाटला. पण आज मी जेव्हा या गोष्टी पाहतो, तेव्हा मनात खूप आनंद होतो. हजारो कुटुंबांची स्वप्न जेव्हा साकार होतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद माझी सर्वात मोठी कमाई आहे. हेच सांगत असताना मोदींना रडू कोसळले. तसेच, महाराष्ट्र राममय झाला आहे याचा मला आनंद आहे आणि याच वातावरणात तुमचा गृहप्रवेश होत आहे, हे पाहून मला आणखी आनंद झाला आहे. आज एक लाखापेक्षा जास्त लोकांना घर मिळत आहे त्यामुळेही आनंद होत असल्याच्या भावना मोदींनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी भावूक झाल्याबाबतची पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही करण्यात आली आहे. “भावुक क्षण… पूरी हो रही है मा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की गारंटी…” असे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -