Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchen Tips : बटाट्याला मोड येण्यापासून वाचवा; 'या' ट्रिक्स करा फॉलो

Kitchen Tips : बटाट्याला मोड येण्यापासून वाचवा; ‘या’ ट्रिक्स करा फॉलो

Subscribe

भारतीय स्वयंपाकघर बटाट्याशिवाय अपूर्ण आहे. प्रत्येक दिवशी बटाटा करी, बटाटा पराठा इत्यादी पाककृती भारतीय स्वयंपाकघरात बनवल्या जातात.

भारतीय स्वयंपाकघर बटाट्याशिवाय अपूर्ण आहे. प्रत्येक दिवशी बटाटा करी, बटाटा पराठा इत्यादी पाककृती भारतीय स्वयंपाकघरात बनवल्या जातात. अनेकांना बटाटे रोज भाजीत मिक्स करून खायला आवडतात. म्हणूनच बरेच लोक बटाटे मोठ्या प्रमाणात खरेदी करतात आणि स्वयंपाकघरात ठेवतात.

पण घरात बटाटे मोठ्या प्रमाणात एकत्र ठेवल्यास त्यांनाही लवकर अंकुर फुटू लागतात. बटाट्यांना मोड यायला लागले की त्यांना खावेसे वाटत नाही आणि कधी कधी ते सडू लागतात. अनेकजण अंकुरलेले बटाटे निरुपयोगी समजून फेकून सुद्धा देतात.

- Advertisement -

Potato nutrition facts & health benefits | Live Science

बटाट्याला मोड येण्यापासून वाचण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो-

- Advertisement -
  • थंड ठिकाणी साठवा-
    उन्हाळ्यात कोणतीही भाजी थंड ठिकाणी ठेवणे चांगले मानले जाते. तसेच थंड ठिकाण म्हणजे फ्रीज असणे आवश्यक नाही. उन्हाळ्यात बटाटे खराब होऊ नयेत असे वाटत असेल तर तुम्ही ते घराच्या थंड ठिकाणी कुठेतरी ठेवू शकता. यासाठी एका सपाट जागी ज्यूटची गोणी ठेवून बटाटे चांगले पसरावेत. आणि यातून बटाटे फार काळ खराब होत नाहीत. तसेच जर बटाटे कोमट जागी ठेवले तर ते लवकर कुजण्यास सुरवात होते.
  • प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका-
    आपण जेव्हा बाजारातून भाजी विकत घेतो आणि घरी आणतो तेव्हा ते नेहमीच प्लास्टिकच्या पिशवीत आणतो आणि त्यातच ठेऊन देतो. त्यामुळे बटाटे खराब होतात. तसेच प्लास्टिकच्या पिशवीत असलेले बटाटे लवकर गरम होतात. अशातच उष्णतेमुळे बटाट्यांना लवकर कोंब फुटू लागतात आणि त्यामुळे ते सडू लागतात. अशावेळी बाजारातून बटाटे आणल्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढून मोकळ्या व थंड जागी ठेवा.
  •  कागदी पिशव्या वापरा-
    जर तुम्हाला उन्हाळ्यात बटाटे खराब होण्यापासून वाचवायचे असेल तर तुम्ही कागदी पिशव्या देखील वापरू शकता. त्यामुळे बटाटे गरमही होत नाहीत आणि हवाही त्यांना लागते. तसेच जर घरी कागदी पिशवी नसेल तर तुम्ही बटाटे न्यूज पेपरमध्ये गुंडाळून ठेवू शकता.

हेही वाचा :

घरच्या घरी बनवा गरम मसाला

 

- Advertisment -

Manini