घरलाईफस्टाईलउशीच्या कव्हरवरील डाग असे हटवा

उशीच्या कव्हरवरील डाग असे हटवा

Subscribe

झोपण्याची उशी व चादर हे नेहमी स्वच्छ धुतलेले फ्रेशच असावे, उशाच्या कव्हरवर अनेक वेळा काळे किंवा तपकिरी डाग दिसतात. या डागांमुळे आपली उशी घाण दिसू लागते. तसेच घाणेरड्या उशा वापरल्याने पिंपल्ससारख्या समस्या उद्भवू शकतात. आपल्या उशीचे कवर पिवळसर होण्यामागे काही कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारणे अशी की, रात्री झोपताना घाम येणे, लाळ, केस आणि स्किन मधील नॅच्युरल ऑइल निघणे. असे केल्याने उशीचे कवर पिवळसर होऊ लागते. त्यामुळे ते स्वच्छ करण्यासाठी केवळ वॉशिंग मशीन मध्ये धुणे पुरेसे नाही. यासाठी दुसरेही काही उपाय करावे लागतील. जर तुमच्या उशीलाही डाग पडले असतील तर तुम्ही ते साफ करण्यासाठी सोप्या ट्रिक्स वापरु शकता.

उशीच्या कव्हरला आठवड्यामधून एक ते दोन वेळा धुने अत्यंत गरजेचे असते. परंतु उशीला वर्षामधून तीन ते चारवेळा धुणे गरजेचे असते. असं केल्याने तुमची उशी नव्यासारखी बनून राहील.

- Advertisement -

उशावरील डाग कसे काढायचे:
पांढऱ्या उशीवर काळे किंवा तपकिरी डाग असतील तर ते तुमच्या उशीचे सौंदर्य बिघडवतात. अशा परिस्थितीत, ते स्वच्छ करण्यासाठी, आपण काही सोप्या हॅकची मदत घ्यावी. उदाहरणार्थ, हे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही ब्लिचिंग पावडरचा वापर करावा. ब्लीचिंग पावडरच्या मदतीने काही मिनिटांत डाग साफ करता येतात.

काळे किंवा तपकिरी डाग घालवा:
उशावरील काळे किंवा तपकिरी डाग घालवण्यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही. तुम्हाला व्हिनेगर आणि बेकिंग सोडाचे द्रावण तयार करावे लागेल. हे द्रावण डाग झालेल्या भागावर लावा आणि काही वेळ राहू द्या. अशा स्थितीत काही मिनिटांत डाग निघून जातात. काही वेळाने उशीचे आवरण गरम पाण्यात स्वच्छ करावे लागते. डाग देखील निघून जाईल आणि काही मिनिटांत तुमची उशी स्वच्छ होईल.

- Advertisement -

लिंबू आणि बेकिंग सोडासह स्वच्छ करा:
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही लिंबू आणि बेकिंग सोडाच्या मदतीने तुमचे उशाचे कव्हर स्वच्छ करू शकता . लिंबू आणि बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट तयार करा आणि डाग झालेल्या भागावर लावा आणि काही वेळ राहू द्या. अशा स्थितीत उशीवरील डाग काही मिनिटांतच निघून जातात. ब्रशच्या मदतीने उशी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने संपूर्ण डाग निघून जाईल.

वॉशिंग मशीनमध्ये उशा धुणे सुरक्षित आहे का?
तुमच्या उशीच्या प्रकारावर हे उत्तर अवलंबून आहे. अलीकडे बहुतांश उशा या डाउन, कॉटन आणि सिंथेटिक असतात म्हणजेच पाणी किंवा पावडरने धुतल्यास कापूस सडण्याची शक्यता कमी असते. मात्र वॉशिंग मशिनमध्ये मेमरी फोम उशा कधीही धुवू नका. तुम्ही त्याऐवजी मोठ्या टपात पाणी घेऊन हाताने या उशा धुवू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -