Monday, April 29, 2024
घरमानिनीsummer Food : उन्हाळ्यात कैरीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

summer Food : उन्हाळ्यात कैरीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

Subscribe

कैरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आंब्याप्रमाणे कच्ची कैरी ही देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात कैरीचे अनेक पदार्थ तयार केले जातात. या शिवाय पावसाळा येईपर्यंत मार्केटमध्ये कैरी उपलब्ध असते. कैरीचे लोणचं  चटणी अगदी पन्ह देखील तयार केलं जातं. कैरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आंब्याप्रमाणे कच्ची कैरी ही देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Raw Mango Health Benefits | HerZindagi

- Advertisement -

कैरीपासून आरोग्याला होतात ‘हे’ फायदे….

  • कच्या कैरीमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कैरी आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
  • कैरीत असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रक्ताचे विकार होत नाहीत तसेच रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे आजार दूर होतात.
  • कैरी खाल्ल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. तसंच नवीन रक्तपेशी तयार होण्यासही मदत होते.
  •  कैरी खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
  •  व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारा स्कर्वी रोग कैरीच्या सेवनाने बरा होतो.

Raw Mango Benefits | 5 unique ways to use raw mangoes

- Advertisement -
  •  कैरी खाल्ल्यामुळे दात मजबूत होतात.
  •  तसंच तोंडातून दुर्गंध येण्याची समस्या दूर होते.
  •  कैरी खाल्ल्यामुळे उष्माघात होत नाही.
  • उष्माघाताचा त्रास असेल तर कैरीचे पन्ह पिणं खूप फायदेशी आहे.
  •  डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी कैरीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कैरीमुळे शुगर लेवल कमी होते.
  •  केसासाठी कैरीचे सेवन करणे चांगले आहे. कैरीमुळे केस जाड आणि चमकदार होतात.

कच्या कैरीचे असे अनेक फायदे शरीराला होतात. आणि त्यामुळेच उन्हाळ्यात कैरी खाणे शरीराला खूप फायदेशीर आहे. तसेच ठराविक फळे ऋतूप्रमाणे खावी त्यामुळे शरीराला त्याचा चांगला फायदा होतो.


हेही वाचा :

Summer Food : उन्हाळ्यात बनवा आवळ्याचं चटपटीत लोणचं

- Advertisment -

Manini