Sunday, April 28, 2024
घरमानिनीतुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या अफेअर्सबद्दल माहिती आहे का?

तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या अफेअर्सबद्दल माहिती आहे का?

Subscribe

प्रेमाचे नाते इतके सुंदर असते की, त्याबद्दल विचार जरी केला तरी चेहऱ्यावर आपोआप हसू येते. कॉलेजला जाणारी तरुण मंडळी असो किंवा विवाहित कपल्स, प्रेमाची जाणीव ही प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच घर करुन राहते. पण सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे प्रेमाची व्याख्या ही बदलली गेली आहे. आयुष्यभरासाठी लाइफ पार्टनर निवडण्यापूर्वी लोक एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एकमेकांसोबत वेळ घालवणे, डिनरसाठी एकत्रित जाणे किंवा सध्याचे कपल्स लिव्ह इन रिलेशनशिपचा सुद्धा पर्याय निवडतात. पण तुम्ही कधी अशा काही अफेअर्स बद्दल ऐकले आहे का, ज्याबद्दल खरंच तुमचा विश्वास बसणार नाही की, असे सुद्धा अफेअर्स असतात.

-इमोशनल अफेअर

- Advertisement -


या प्रकारच्या अफेअरमध्ये लोक शारिरीक रुपात एकमेकांसोबत जोडलेले नसतात. हे असे एक अफेअर असते ज्यामध्ये दोन लोक भावनात्मक रुपातने एकमेकांना जोडले गेले असतात. प्रत्येक वेळी एकमेकांबद्दल विचार करणे, मेसेज करणे, फ्लर्ट करणे अशा गोष्टी मात्र त्यांच्यामध्ये होत असतात.

-सेक्शुअल अफेअर

- Advertisement -


ही अफेअर मधील सर्वसामान्य गोष्ट आहे. यामध्ये दोन व्यक्ती सेक्शुअल गोष्टींसाठी केवळ जोडलेले असतात. असे नाते तो पर्यंतच टिकते जो पर्यंत ते एकमेकांना त्या रुपात कंटाळत नाहीत.

-रिवेंज अफेअर


या अफेअरमध्ये आपल्या पार्टनरचा बदला घेणे किंवा त्याला खालीपणा दाखवण्यासाठी केले जाते. या व्यतिरिक्त एखाद्या पार्टनरने दुसऱ्याला फसवले तर ते अशा पद्धतीचे नाते ठेवतात.

-संधीसाधू अफेअर


या अफेरमध्ये दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो. असे अफेअर त्यावेळी होतात जेव्हा पार्टनर ऑफिसच्या कामासाठी दूर प्रवास करत असेल, घटस्फोटासारख्या प्रॉब्लेममधून जात असेल किंवा ज्याचे ब्रेकअप झाले असेल.


हेही वाचा- रिलेशनशिपमध्ये पार्टनरला Cheat केलंय तर, माफीही मागा

- Advertisment -

Manini