घरताज्या घडामोडीPakistan : कराची एक्स्प्रेसला भीषण आग, 3 मुलांसह 7 जणांचा मृत्यू

Pakistan : कराची एक्स्प्रेसला भीषण आग, 3 मुलांसह 7 जणांचा मृत्यू

Subscribe

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एक्स्प्रेस पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागली. या आगीत ट्रेनमधील तीन मुले आणि एका महिलेसह किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एक्स्प्रेस पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रेनमधील तीन मुले आणि एका महिलेसह किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कराचीहून लाहोरला जाणाऱ्या कराची एक्सप्रेसच्या बिझनेस क्लासच्या डब्यात आग लागली. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. (pakistan fire in karachi express seven people burnt to death)

४० मिनिटांत आग आटोक्यात

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री कराचीहून लाहोरला जाणाऱ्या कराची एक्सप्रेसच्या बिझनेस क्लासच्या डब्यात आग लागली. या आगीची माहिती मिळताच जवळच्या स्थानकावर एक्स्प्रेस थांबवण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाला आपत्कालीन कारवाईसाठी कळवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवानांनी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ४० मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश मिळाले.

रेल्वे मंत्रालयाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

- Advertisement -

याबाबत रेल्वेचे प्रवक्ते मकसूद कुंडी यांनी अधिक माहिती दिली. त्यानुसार, “डब्याला आग कशी लागली याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्यानंतर ट्रेनमधून डबा वेगळा करण्यात आला. या घटनेत तीन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेत एका महिलेलाही आपला जीव गमवावा लागला आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत”, असे रेल्वेचे प्रवक्ते मकसूद कुंडी यांनी सांगितले.


हेही वाचा – पंजाबमधील निवडणुकांबाबत अनिश्चितता, पाकिस्तान खंडपीठात पुन्हा सुनावणी सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -