Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthHealth Tips : सोडा, जलजीरा आरोग्यासाठी घातक

Health Tips : सोडा, जलजीरा आरोग्यासाठी घातक

Subscribe

सोडा,जलजीरा जास्त प्रमाणात सेवन केल्यास या समस्या उद्भवतात. त्यामुळे शरीर निरोगी राहत नाही.

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच शरीराला थंडावा मिळण्यासाठी आता सर्रास लोकं सोडा,जलजीरा हे अगदी पटकन पितात. ऍसिडिटीवर लगेच उपाय मिळवण्यासाठी हे पेय लोक फार अगदी भान न ठेवता पियाले जातात. नैसर्गिक फळांचे ज्युस आपण जेव्हा सेवन करतो तेव्हा आपल्या शरीरावर त्याचा मोठा असा परिणाम नाही होत.

परंतू पोटातला गॅस कमी करण्यासाठी सोडा हा अतिप्रणामात जर सेवन केला तर तो अतिशय हानिकारक तर होतोच आणि महत्वाच म्हणजे लिव्हरवर याचा परिणाम होतो.

- Advertisement -

 

- Advertisement -

सोडा पाणी आणि जलजीरा पावडर पियाल्याने लिव्हरमध्ये अशाप्रकारे त्रास उद्भवतो-

  • जास्त सोडा प्यायल्याने फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते.
  • ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे, त्यांनी सोडा प्यायल्यास त्यांना श्वसनाचा त्रास वाढू शकतो.
  • बाजारात विकल्या जाणार्‍या जलजीरा पावडरमध्ये हिमालयीन मीठ म्हणजेच काळे मीठ जास्त प्रमाणात असते, त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
  • गरोदर स्त्रिया किंवा बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांनी विशेषतः अशी चूर्ण पेय घेणे टाळावे.
  • मधुमेही रुग्णांनी आम पन्ना चूर्ण पिणे टाळावे कारण त्यात कॅलरीज जास्त असतात.
  • ते जास्त प्रमाणात प्यायल्याने अॅसिडिटी, अॅलर्जी आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात.
  • फ्लेवर्ड आणि एसेन्स फळांच्या रसामुळे लिव्हरला नुकसान होऊ शकते.
  • मात्र जास्त प्रमाणत वापरल्यास त्यात असलेल्या रसायनांचा थेट परिणाम यकृत आणि मूत्रपिंडावर होतो.

हेही वाचा :

womens Health : महिलांसाठी उपयुक्त बीट ज्यूस

- Advertisment -

Manini