Saturday, June 10, 2023
घर मानिनी Diary Toxic नात्यात राहण्याऐवजी विभक्त होण्याच्या सेलिब्रेशनचा ट्रेंड

Toxic नात्यात राहण्याऐवजी विभक्त होण्याच्या सेलिब्रेशनचा ट्रेंड

Subscribe

रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर एकमेकांना सांभाळून घेण्याची जबाबदारी ही दोघांची असते. मात्र नात्यात वाद अधिक होऊ लागले की, दूरावा निर्माण होतो. सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे तणाव, चिडचिड या समस्या उद्भवतात. अशातच आता एका महिलेचे सोशल मीडियात काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. त्यात ती तिच्या घटस्फोटाचा आनंद साजरा करताना दिसतेय. परंतु यावर काही लोकांनी आक्षेप घेतला असून संताप व्यक्त करतायत.परंतु दुसऱ्या बाजूला काही लोक तिला सपोर्ट ही करत आहेत.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या महिलेचे नाव शालिनी असे आहे. तिने आपले घटस्फोटाचे फोटोशूट केलेयं. या फोटोशूट मधून तिने असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, एका घटस्फोटित महिलेला तिचा मेसेज थोडा विचित्र वाटेल. पण एका अयोग्य विवाहाच्या नात्यातून बाहेर पडणे योग्य आहे. कारण तुम्ही आनंदी राहणे डिजर्व करता. आपल्या आयुष्याचे नियंत्रण तुमच्याकडेच असावे आणि मुलांच्या उत्तम भविष्यासाठी सुद्धा जरुर बदल करा.घटस्फोट म्हणजे आयुष्य संपलेले नाही. हा तुमच्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठीचा टर्निंग पॉइंट आहे. लग्न मोडणे आणि करणे यासाठी फार धाडस लागते असे शालिनी म्हणते.

 

View this post on Instagram

 

A post shared by shalini (@shalu2626)

- Advertisement -

शालिनीचा फोटो शूट खुप व्हायरल झाले आहे. यावर युजर्सकडून जोरदार प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काहीजण तिला सपोर्ट करतायत तर काहीजण तिच्या या फोटोशूटमुळे सुनावत ही आहेत. परंतु काहीही असो एका महिलेले घेतलेला असा निर्णय हा तिचा सर्वस्वी आहे. त्यात दुसऱ्या व्यक्तीने येऊन बोलणे किती चुकीचे आणि बरोबर हे कळले पाहिजे.


- Advertisement -

हेही वाचा- आपल्या पालकांचा खर्चाचा बोजा नवऱ्यावर टाकणे किती योग्य…

 

- Advertisment -

Manini