Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthKewra Leaf: केवड्याच्या पानाचे बहुगुणी फायदे

Kewra Leaf: केवड्याच्या पानाचे बहुगुणी फायदे

Subscribe

केवडा हे फुल अनेक लोकांना माहिती आहे. विशेष म्हणजे केवडा हा एक सुगंधी वृक्ष आहे. साधारणतः हा वृक्ष घनदाट जंगलांमध्ये सापडतो. हा वृक्ष अतिशय उंच आणि घनदाट असून याची पानं ही काटेरी असतात. केवड्याच्या झाडांचे दोन प्रकार आहेत एक पांढरा आणि एक पिवळा. पांढऱ्या रंगाच्या फुलाला केवडा म्हणतात तर दुसऱ्या पिवळ्या रंगाच्या फुलाला केतकी असं म्हटलं जातं. केतकीचं फुल हे अतिशय सुगंधित असतं आणि त्याची पानंही अतिशय नाजूक असतात. तर केवड्याला अनेक नावं आहेत. केवड्याला गंधपुष्प, धूतिपुष्पिका, केंदा, केऊर, गोजंगी, केवर, नृपप्रिया इत्यादी अनेक नावांनी ओळखलं जातं.

Kewra Water: Brilliant Beauty Benefits Of This Floral Potion For Glowing Skin

- Advertisement -

केवड्याचे आयुर्वेदिक फायदे-Ayurvedic Benefits Of Kewra 

  • केवड्याच्या फुलापासून केवडा जल (Kewra Water) आणि केवडा तेल (Kewra Oil) बनवण्यात येतं.
  • याचा सुगंध मनाला एक प्रकारची शांतता देतो.
  • केवड्यामध्ये अँटीफंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात, ज्यामुळे कोणतेही आजार लगेच होत नाही.
  • केवड्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्या सेवनाने शरीराला आराम मिळतो.
  • केवड्याच्या तेलाचा उपयोग आयुर्वेदाच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे.
  • हे तेल डोकं दुखत असल्यास, तुमच्या डोक्यावर अथवा झालेल्या गाठींवर लावल्यास, डोकेदुखी बंद होते.
  •  या फुलामध्ये शरीराचं सौंदर्य वाढवणारे गुणदेखील आहेत.

How to Grow Kewra Flower Plant | Growing Fragrant Screw Pine

- Advertisement -

केवड्याचे सौंदर्यासाठी फायदे-

  • केवडा एखाद्या क्लिंझरप्रमाणे काम करतो. तसेच चेहऱ्यावरील घाण केवडा काढून टाकतो.
  • एक चांगल्या टोनरच्या स्वरूपातही केवड्याचा उपयोग होतो.
  • त्वचेवरील ओपन पोअर्स केवड्यामुळे बंद होतात.
  • चेहऱ्यावरील चमक वाढवण्यास उपयोगी.
  • केवड्यामध्ये असलेल्या अँटीएजिंग गुणामुळे त्वचेला पोषण मिळतं. यामुळे तुमची त्वचा बऱ्याच काळापर्यंत तरूण राहते.
  • केवड्याचं पाणी त्वचेवर चांगला परिणाम मिळवून देतं.
  • केवड्याच्या पाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्वचेवरील डाग आणि पिंपल्स यामुळे नाहीसे होतात.

हेही वाचा : Rainbow Diet म्हणजे काय ? काय आहेत याचे फायदे ?

- Advertisment -

Manini