Tuesday, April 30, 2024
घरमानिनीReligiousVat Purnima 2023 : वटपौर्णिमेला 'या' रंगाची नेसणं मानलं जातं अशुभ

Vat Purnima 2023 : वटपौर्णिमेला ‘या’ रंगाची नेसणं मानलं जातं अशुभ

Subscribe

ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे. यावर्षी हा सण 3 जून रोजी साजरा केला जाईल. या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. शिवाय पूजा करण्यापूर्वी महिला सुंदर साडी, दागिने घालून साज श्रृंगार करतात.

वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी?

Vat Savitri Purnima observed in India

- Advertisement -

वटपौर्णिमा हा सण विशेषतः विवाहित महिलांसाठी खास मानला जातो. या दिवशी महिला सुंदर साडी, दागिने घालून साज श्रृंगार करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानले जाते. कारण, हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हिरवा रंग आपल्याला सुख-समृद्धी प्रदान करतो. तर लाल रंग उत्साह, पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो. त्यामुळे या रंगांची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता. शिवाय याव्यतिरिक्त तुम्ही नारंगी, पिवळा, जांभळा किंवा गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता.

वटपौर्णिमेला या रंगाची नेसणं मानलं जातं अशुभ

वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये, काळे-निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानले जाते.

- Advertisement -

वटपौर्णिमेला करा 16 श्रृंगार

Ankita Lokhande turns into a beautiful 'Marathi mulgi' for post-wedding ceremony | Lifestyle News,The Indian Expressज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तसेच इतर दिवशी देखील ज्या महिला श्रृंगार करतात. त्यांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो. वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच इतर साज श्रृंगार करणं देखील शुभ मानलं जातं. यावेळी हातात काचेच्या बांगड्या, केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा, नथ, कुंकू/ टिकली, दागिने, पैंजण, जोडवी, अत्तर असा आवडीनुसार श्रृंगार करावा.

 

 


हेही वाचा : Vat Purnima : वटपौर्णिमेच्या दिवशी करू नका ‘या’ चुका

- Advertisment -

Manini