Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship Parenting Tips: तुमच्या मुलाला सतत राग येतो? मग अशी घ्या काळजी

Parenting Tips: तुमच्या मुलाला सतत राग येतो? मग अशी घ्या काळजी

Subscribe

लहान मुलं जेवढी खळखळून हसतात तेवढाच त्यांना राग ही येतो. मुलांना राग येण्यामागे काही कारणं असू शकतात. लहान-लहान गोष्टीवरुन राग येणे, आपला हट्ट पूर्ण न केल्यास राग येणे, होमवर्क करायचा नाही म्हणून राग येणे अशी अगणित कारण आहेत ज्यामुळे मुलांना राग येऊ शकतो. काहीवेळेस त्यांना राग अधिकच वाढला जातो. (How to handle angry child)

कधीकधी मुलांना राग येणे ही सामान्य बाब आहे. परंतु सतत अधिक राग येणे ही सामान्य गोष्ट नाही. काही वेळा स्थिती अशी होते की, मुलं ही पालकांवर हात उचलण्यास ही मागेपुढे पाहत नाहीत. अशातच पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की, मुलांना वारंवार राग का येतो.

- Advertisement -

कारण जाणून घ्या
मुलांना त्यांना राग येण्यामागील कारण तुम्ही विचारु शकता. त्याचसोबत तुम्ही हे सुद्धा विचारु शकता की, त्याला काय हवयं का? अशावेळी बहुतांश मुलं आपल्या मनातील गोष्ट सांगतात. यावरुन थोडातरी अंदाज लावता येऊ शकतो की, नक्की त्यांना का राग येत असावा. मुलांना राग येण्यामागे त्यांची काही खासगी कारणं सुद्धा असू शकतात.

- Advertisement -

मुलांना समजून घ्या
प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलाला समजून घेतले पाहिजे. तेव्हाच मुलांना कळेल की, जेव्हा तु्म्ही त्यांचे विचार आणि भावना समजून घ्या. मुलांना वेळ दिल्याने त्यांच्या आय़ुष्यात काय सुरुयं हे पालकांना कळू शकते. पुढे जाऊन एखाद्या कारणास्तव मुलाला वारंवार राग येत असेल तर त्याला तुम्ही समजावून सांगितल्यानंतर तो त्यावर सुधार करु शकेल.

सायकोलॉजिस्टला दाखवा
मुलांना सतत राग येत असेल आणि त्यामागील कारणं ही तुम्हाला कळत नसतील तर एखाद्या सायकोलॉजिस्टला भेटा. त्यावेळी तुमच्या मुलाला सुद्धा सोबत घेऊन जा. जेणेकरुन मनोवैज्ञानिक मुलाच्या रागामागील नेमकी कारणं तुम्हाला सांगेल. (How to handle angry child)

प्रत्येक हट्ट पूर्ण करु नका
काही वेळेस पालक अधिक प्रेमापोटी मुलाची प्रत्येक गोष्ट ऐकतात. अशाने मुलं खुप लाडावली जातातच पण त्यांना हट्ट करण्याची ही सवय लागते. त्यामुळे मुलांचे प्रत्येक हट्ट पूर्ण करु नका. तुम्ही ते करत राहिलात आणि एखाद्यावेळी त्यासाठी नकार दिला तर त्याला राग येऊ शकतो हे लक्षात घ्या.


हेही वाचा- अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना असे बनवा topper

- Advertisment -

Manini