Friday, April 26, 2024
घरमानिनीReligiousकधी आहे वटपौर्णिमा? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

कधी आहे वटपौर्णिमा? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Subscribe

मराठी दिनर्दशिकेनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. यावर्षी हा सण 3 जून रोजी साजरा केला जाईल.

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त

पौर्णिमा प्रारंभ : 2 जून रोजी रात्री 10 वाजून 22 मिनिटांपासून
पौर्णिमा समाप्ती : 3 जून संध्याकाळी 15 वाजून 09 मिनिटांपर्यंत. शनिवार , 3 जून रोजी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाईल.

- Advertisement -

वटपौर्णिमेचे महत्त्व

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते, त्यामुळेच या सणाला वटपौर्णिमा म्हणटले जाते. या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दिर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी उपवास पकडून वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाला सात फेरे घालून सात जन्म तोच पति मिळावा. अशी मानोकामना देवाकडे मागतात.

- Advertisement -

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य

1 सूतगंडी, 2 खारीक , 2 बदाम, 10 सुपाऱ्या , 2 खोबरे वाटी , खडीसाखर, गुळाचा खडा, अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू, धूप , तूपाचे निरंजन, 25 विड्याची पाने , आंबे, पानवड्यांचा नैवेद्य, यथा शक्ति दक्षिणा, पंचामृत, ताम्हण, कलश, कापूर, फूले-दुर्वा, तूळशीपत्र, पाच फळं.

 


हेही वाचा :

Buddha Purnima 2023 : पौर्णिमेच्या ‘या’ उपायांनी देवी लक्ष्मी होतील प्रसन्न

- Advertisment -

Manini