Saturday, May 4, 2024
घरमानिनीReligiousChanakya Niti : इतरांना आपल्या 'या' गोष्टी कधीही सांगू नये

Chanakya Niti : इतरांना आपल्या ‘या’ गोष्टी कधीही सांगू नये

Subscribe

आचार्य चाणक्य याचे नितीशास्त्र हे सामान्य व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित आहे. चाणक्य यांचा प्रत्येक संदेश आपल्याला आयुष्य कसे जगावे याची शिकवण देतो. यामुळे चाणक्य यांची निती लोकप्रिय आहे. आजकालच्या काळात कोणती व्यक्ती कशी आहे, हे कळणं खूप कठीण आहे. परंतु जर चाणक्य नीती वाचून त्याप्रमाणे त्यांचं अनुसरण केल्यास आपल्याला अनेक व्यक्तींना त्यांच्या गुणांवरून सहज ओळखता येईल, शिवाय चाणक्यांच्या तत्त्वाचे अवलंब केल्यास आपल्या आयुष्यातील अनेक लहान-मोठ्या गोष्टींचं समाधान मिळू शकतं. आचार्य चाणक्य यांनी मानवाचे आचार-विचार, व्यवहार, गुण-अवगुण यांसारख्या अनेक गोष्टींचा उलगडा त्यांच्या ग्रंथांद्वारे मांडलेला आहे, ज्याचं अनुसार आजही अनेक लोक करतात.

इतरांना आपल्या ‘या’ गोष्टी कधीही सांगू नये

पती पत्नीमधील संबंध

10 Things Every Husband Should Be Doing for His Wifeचाणक्य नीतीनुसार पती-पत्नीचे संबंध खासगी असतात. यामुळे त्यांच्यातील वाद किंवा सुसंवादाबद्दल तिसऱ्या व्यक्तीबरोबर चर्चा करू नये. यामुळे दांपत्य जीवनात वादळ येऊ शकते. नातेसंबंध अधिक बिघडू शकतात.

- Advertisement -

कामाशी संबंधित योजना

20 Things To Do Well at Work | Indeed.comआचार्य चाणक्य यांच्यामते कामाशी संबंधित जर तुमच्या काही भविष्यातील योजना असतील तर त्यांची चर्चा करु नये. त्यामुळे तुमचे स्पर्धक अडचणी निर्माण करतील. तुमच्या योजना यशस्वी होण्यात अडचणी येतील. यामुळे योजना पूर्ण झाल्यानंतरच त्याबद्दल इतरांना सांगावे.

- Advertisement -

कुटुंबातील अंतर्गत गोष्टी

This Lockdown Period, Bond With Your Family
प्रत्येक कुटुंबात छोटे मोठे वाद होतात. हे वाद कधी संपत्तीवरून असतात तर कधी मानपानावरून. पण जर त्याबद्दल तुम्ही लोकांना सांगत सुटलात तर समोरची व्यक्ती तुम्हांला योग्य सल्ला देईलच असे नाही. तर कदाचित तुमच्यातील वाद कसे वाढतील. नातेसंबंध कसे बिघडतील यासाठी तुम्हांला चुकीचा सल्ला देऊ शकतात. यामुळे आपसातच सामंजस्याने कुंटुंबातील समस्यांचे निराकरण करावे.

अपमानाच्या घटना

Insults Images – Browse 52,056 Stock Photos, Vectors, and Video | Adobe  Stockनीती शास्त्राप्रमाणे जर तुमचा कधी कोणी अपमान केला असेल तर त्याबद्दल कधीही चारचौघात बोलू नये. यामुळे लोकं तुमच्यावरच प्रश्नचिन्ह उभारतील. हीच माणसं इतर चारजणांना तुमच्या अपमानाच्या गोष्टी आनंद घेऊन सांगतील. त्यामुळे तुमची नातलगांमध्ये, कार्यक्षेत्रामध्ये असलेली तुमची प्रतिमा डागाळेल. तुमच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभारले जातील.


हेही वाचा : Chanakya Niti : अयशस्वी पुरुषांची ‘ही’ आहेत 5 लक्षणं

- Advertisment -

Manini