घरपालघरWada News: मांडा -भोपिवली- खरीवली रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट

Wada News: मांडा -भोपिवली- खरीवली रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट

Subscribe

त्यानंतर ते मटेरियल लॅबमध्ये पाठविण्यात आले असून पुन्हा जर असे मटेरियल या रस्त्यावर आणले तर काम बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

वाडा : वाडा तालुक्यातील मांडा- भोपिवली- खरीवली या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षापासून दुरावस्था झाली होती. ग्रामस्थांनी शासन दरबारी हेलपाटे मारून अखेर हा रस्ता या वर्षी मंजूर झाला असून या रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. मात्र ठेकेदाराकडून रस्त्याचे काम नियमाप्रमाणे होत नसून हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू केल्याने ग्रामस्थांनी निकृष्ट कामाचा जाब ठेकेदाराला विचारला.त्यानंतर ते मटेरियल लॅबमध्ये पाठविण्यात आले असून पुन्हा जर असे मटेरियल या रस्त्यावर आणले तर काम बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार व्हावेत म्हणून सरकारने पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत रस्त्यांसाठी भरीव निधी दिला. वाड्यातील ५.२ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे ११ कोटी १२ लाखांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर केला गेला. मात्र रस्त्याचे काम करताना ठेकेदार कंपनीने गुणवत्ता राखली गेली नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.मांडा -भोपिवली- खरीवली रस्त्याच्या ५.२ किलोमीटर अंतरामध्ये सुमारे चार मोर्‍या व एक सेप्टी वॉलचा समावेश आहे. या सर्वच कामांमध्ये ठेकेदार नियमाप्रमाणे काम करत नसून कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. हे ठेकेदाराच्या निदर्शनास आणून देऊन देखील ठेकेदार ऐकून घेत नसल्याने त्याला निर्वाणीचा इशाला देण्यात आला असल्याचे या ग्रामपंचायतीचे उपसरपंच आझाद अधिकारी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -