घरपालघरमहामार्गावरील व्हाइट टॅपिंग सिमेंट काँक्रिट कामाचा भोंगळ कारभार

महामार्गावरील व्हाइट टॅपिंग सिमेंट काँक्रिट कामाचा भोंगळ कारभार

Subscribe

या मुळे तेथील नागरिकांनी रास्ता रोको करून त्यांना तलासरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले.

तलासरी: मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी अपूर्ण आणि नियोजनशून्य कामामुळे अपघातांत वाढ होत आहे. शुक्रवार ता.५एप्रिल रोजी रात्री मुंबईकडून गुजरात दिशेने जाणार्‍या वाहिनीवर तलासरीजवळ सिमेंट काँक्रिटीकरणाच्या अर्धवट कामामुळे दुचाकीवरील दोन जणांचा अपघात होऊन त्यात ते गंभीर जखमी झालेत. अर्धवट काम, सूचना फलकांची कमतरता या मुळे रात्रीच्या वेळी दुचाकी चालकांना या नविन काम सुरु असलेल्या भागांत नीट न दिसल्याने ते दुभाजकास जोरदार धडकत अपघात ग्रस्त झाले. ते गंभीर अवस्थेत असताना महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका वेळेत पोहचली नाही.या मुळे तेथील नागरिकांनी रास्ता रोको करून त्यांना तलासरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले.

परंतु गंभीर अवस्थेत व बेशुद्ध असल्याने त्या दोन्ही रुग्णांना सेल्वास येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. केवळ तीन महिन्यांत या महामार्गावर पालघर जिल्हयात 107 अपघात झाले असून यात 58 जणांचा मृत्यू तर ते 41 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम, वाहतूक नियोजनाचा ढिसाळ कारभार, आणि रोज होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिमेंट काँक्रिटीकरण कामामुळे दररोजची वाहतूक कोंडी सोडवताना महामार्ग पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर, दररोज होत असलेल्या तासनतास वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरील वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -