Hindu Shastra : शनीदेवाची पूजा करताना करा ‘या’ 5 नियमांचे पालन

हिंदू धर्मात प्रत्येक देवाला आणि ग्रहाला आठवड्यातील एक वार समर्पित केला जातो. त्याप्रमाणेच शनीवार हा शनीदेवांना समर्पित केला आहे. शनीवारी शनीदेवांची मनापासून पूजा केल्यास शनीदेवल प्रसन्न होतात.

ज्योतिषशास्त्रात शनी देवांना (ग्रहाला) खूप महत्त्व दिले जाते. असं म्हणतात की, शनीदेव जितके रागीट आहेत, तितकेच ते दयाळू सुद्धा आहेत. चांगले कर्म करणाऱ्या लोकांना शनीदेव कधीही त्रास देत नाहीत, मात्र दुसऱ्यांना विनाकारण छळणाऱ्या शनीदेव चांगलीच शिक्षा देतात.

हिंदू धर्मात प्रत्येक देवाला आणि ग्रहाला आठवड्यातील एक वार समर्पित केला जातो. त्याप्रमाणेच शनिवार हा शनीदेवांना समर्पित केला आहे. शनिवारी शनीदेवांची मनापासून पूजा केल्यास शनीदेवल प्रसन्न होतात. परंतु त्यांची पूजा करताना काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे, नाहीतर ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

शनीदेवांची पूजा करताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

 • शनिवारी या रंगाचे कपडे घालू नका
  शनीदेवांना काळा आणि निळा रंग प्रिय आहे. अशात प्रत्येक शनिवारी काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे घालावे. परंतु या दिवशी कधीही लाल रंगाचे कपडे घालू नये, कारण लाल हा रंग मंगळ ग्रहाचे प्रतीक आहे. मंगळ आणि शनी एकमेकांचे शत्रू आहेत. त्यामुळे या दिवशी कधीही लाल रंग परिधान करू नका.
 • या दिशेला करा शनीची पूजा
  शनीदेवांची पूजा करताना नेहमी पश्चिमेला तोंड करावे. शनीदेवांना पश्चिम दिशेचे स्वामी मानले जाते.
 • या गोष्टींचा दाखवा नैवेद्य
  शनीदेवांना प्रसन्न करायचे असेल तर शनीदेवांना तिळ, गूळ आणि खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
 • तांब्याच्या भांड्याने करू नका शनीची पूजा
  शनीदेवांची पूजा करताना कधीही तांब्याच्या भांड्यांचा वापर करू नये. कारण, तांब्याचा संबंध सूर्य ग्रहाशी जोडला जातो. शनीदेव सूर्यदेवाचे पुत्र आहेत, परंतु दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत.
 • पूजा करताना शनीदेवांच्या डोळ्यांकडे पाहू नका
  शनीदेवांची पूजा करताना त्यांच्या डोळ्यांकडे पाहू नका, कारण यामागे काही धार्मिक मान्यता जोडलेल्या आहेत.


 

हेही वाचा :Hindu Shastra : शनीच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ महत्त्वाचे उपाय