Hindu Shastra : मंदिराबाहेरून चप्पल चोरी झाल्यास मानले जाते शुभ

ज्योतिष शास्त्रानुसार मंदिराबाहेर जर शनिवारच्या दिवशी कोणाची चप्पल चोरीला गेली तर, याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मागचा त्रास लवकरच समाप्त होणार आहे

हिंदू धर्मात आपण कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करताना बाहेर चप्पल काढून देवाच्या दर्शनासाठी आतमध्ये जातो. मात्र अनेकदा लोकांच्या मनात मंदिराबाहेर चप्पल चोरी होण्याची चिंता सतावत असते. जर कुठल्या व्यक्तीसोबत असं होत असेल तर, नाराज व्हायची अजिबात गरज नाही. ज्योतिष शास्त्रानुसार, मंदिराबाहेर चप्पल चोरी झाल्यास हा शुभ संकेत मानला जाते. मात्र हे जर शनिवारच्या दिवशी झालं, तरच हे शुभ मानलं जातं.

मंदिराबाहेर चप्पल होण्यामागचा अर्थ

  • ज्योतिष शास्त्रानुसार मंदिराबाहेर जर शनिवारच्या दिवशी कोणाची चप्पल चोरीला गेली तर, याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मागचा त्रास लवकरच समाप्त होणार आहे. शिवाय त्याती दरिद्रतेपासून सुटका होणार आहे. कर्जापासून सुटका होणार आहे. त्यामुळे हे शुभ मानले जाते.
  • शनिवारच्या दिवशी मंदिराबाहेरून जर कोणाची चप्पल चोरी झाली असेल तर, ते अत्यंत शुभ मानले जाते. कारण आपल्या पायांमध्ये शनीचा वास असतो. त्यामुळे पायांशी संबंध असल्यामुळे चप्पलेचा संबंधीत ग्रह शनी आहे.
  • ज्योतिष शास्त्रानुसार, चप्पलेचे दान केल्याने शनी देवांची कृपा प्राप्त होते. कुंडलीमध्ये शनी ग्रह कमजोर असल्याने व्यक्तीच्या अनेक कार्यक्रमांत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे त्यांना सहज कोणत्या कामात यश प्राप्त होत नाही. अशावेळी जर एखाद्याची चप्पल चोरी झाल्यास तो शुभ संकेत मानला जातो.

हेही वाचा :Hindu Shastra : देवघरातील ‘या’ ३ गोष्टी मानल्या जातात अशुभ