घरभक्तीमंदिराबाहेरुन चप्पल चोरी होणं मानलं जातं शुभ; 'हे' आहे कारण...

मंदिराबाहेरुन चप्पल चोरी होणं मानलं जातं शुभ; ‘हे’ आहे कारण…

Subscribe

हिंदू धर्मातील कोणत्याही मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जाताना आपण मंदिराबाहेर चप्पल काढतो. अनेकदा मंदिराबाहेरुन चप्पल-बूट अचानक चोरीला जातात. अशावेळी आपल्याला वाईट वाटतं. पण शास्त्रानुसार, मंदिराबाहेरुन चप्पल-बूट चोरी होणं शुभ मानलं जातं.

भारतीय ज्योतिष शास्त्रामध्ये, अनेक प्रकारच्या मान्यता आहेत. प्रत्येक मान्यतेबाबत शुभ आणि अशुभ परिणाम आहेत. मंदिराबाहेरुन चप्पल-बूट चोरी होणं शुभ मानलं जातं. हा एक शुभ संकेत समजला जातो. याचा अर्थ लवकरच तुमचा वाईट काळ संपणार आहे आणि आयुष्यात सुख येणार आहे असं मानलं जातं.

- Advertisement -

Most Important Things To Remember When Doing Puja | मंदिर में जूते-चप्पल उतारते समय कभी न पलटें, इन बातों का रखें विशेष ध्यान | Patrika News

ज्योतिष मान्यतेनुसार, आपल्या शरिरातील प्रत्येक अवयवांवर विविध ग्रहांचा प्रभाव असतो. असं म्हणतात आपल्या पायांवर शनी ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे चप्पल-बूटांवर शनी ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल दान करणं देखील शुभ मानलं जातं.

- Advertisement -

जर एखाद्याच्या कुंडलीत शनि अशुभ स्थितीत असेल तर कामात यश सहजासहजी मिळत नाही. अशा स्थितीत शनिवारी मंदिरातून चप्पल चोरीला गेल्यास याचा अर्थ असा होतो की काहीतरी शुभ घडणार आहे. चप्पल आणि पाय या दोन्हींवर शनीचा प्रभाव पडतो, त्यामुळे चप्पल चोरीला गेली तर असे मानले पाहिजे की संकटाचे दिवस लवकरच संपणार आहेत.

 


हेही वाचा :

Vastu Tips : स्वयंपाक घरातील ‘या’ मसाल्यांपासून करा आर्थिक तंगी दूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -