Saturday, April 27, 2024
घरमानिनीReligiousHoli 2024 : होळीला असणार भद्राकाळ; या मुहूर्तावर करा होलिका दहन

Holi 2024 : होळीला असणार भद्राकाळ; या मुहूर्तावर करा होलिका दहन

Subscribe

हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजल कुळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात.

होलिका दहन मुहूर्त

रविवार, 24 मार्च 2024 रोजी होलिका दहन केले जाईल. परंतु 24 मार्च रोजी सकाळी 9:24 पासून ते रात्री 10:27 पर्यंत भद्राकाळ सुरू होणार आहे. त्यामुळे रात्री 10:27 नंतरच होलिका दहन करने शुभ मानले जाईल. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 24 मार्च रोजी रात्री 11:13 ते 12:27 पर्यंत आहे. या वेळेत देखील होलिका दहन करु शकता.

- Advertisement -

होळी सणाचे महत्त्व

हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या विशेष प्रसंगी सर्व देवी-देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

- Advertisement -

हेही वाचा :

Holi 2024 : होळीच्या दिवशी करा ‘या’ चांदीच्या वस्तूची खरेदी

- Advertisment -

Manini