घरमहाराष्ट्रChitra Wagh : स्वतःच्या कौतुकाचा कशिदा कितीही विणला तरी...; चित्रा वाघ यांची...

Chitra Wagh : स्वतःच्या कौतुकाचा कशिदा कितीही विणला तरी…; चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार चढू लागली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या भाषणात भाजपाला लक्ष्य केले आहे. त्याला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्वीटमधून प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : केजरीवाल तुरुंगातूनही काम करू शकतात; संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी बुलढाण्याच्या दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली होती. मोदी म्हणातात, मैं एकेला सब पे भारी. असे असताना त्यांना उद्धव ठाकरे यांना संपवायाला कचऱ्याची गाडी का लागते, इतडून तिकडून कचरा गोळी करतात आणि मला संपवायला निघाले आहेत. हिंमत असेल तर प्रयत्न करून बघा, गाठ माझ्या मावळ्यांशी आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

- Advertisement -

भाजपाने ज्या पद्धतीने शिवसेना फोडली, लाज वाटायला पाहिजे. त्या काळात मोदी हटाव, असे देशभरात वातावरण असताना बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला. मोदी यांना हटवू नका, असे बाळासाहेबांनी सांगितले. जी शिवसेना त्यांच्यामागे उभी राहिली, तीच शिवसेना संपवायाला ते निघाले असल्याचा आरोप त्यांनी केला.

चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाजपावरील टीकेला उत्तर दिले आहे. मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात आपल्यामुळे विजय मिळाला, अशा वल्गनांचा काही उपयोग नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कौतुकाचा कशिदा कितीही विणला, तरी जनतेला मुळात त्यांच्या नेतृत्वाचे कापड किती ठिकाणी फाटले आहे, याची पुरेपूर जाणीव आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Amit Shah : …तर आपल्याला जय गुजरात घोषणा देण्याची सक्ती; अभिनेत्याची अजितदादा, उदयनराजेंबद्दलची पोस्ट व्हायरल

नरेंद्र मोदी नामक ताऱ्याच्या सावलीत उद्धव ठाकरे हे परप्रकाशी ग्रहासारखे उभे होते, त्यामुळे आपले तेव्हा उजळलेले भाग्य ही पंतप्रधान मोदी यांची देणगी होती, हे ध्यानात ठेवा. सत्तेसाठी त्याच ताऱ्याकडे पाठ फिरवण्याचा करंटेपणा उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे जनताही त्यांना साथ देणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

आता दिवंगत बाळासाहेबांच्या पुण्याईवर ही निवडणूक निभावून नेता येईल, यादेखील भ्रमात उद्धव ठाकरे यांनी राहू नये. बाळासाहेबांचे नेतृत्व स्वयंप्रकाशी होते. ते खऱ्याखुऱ्या सेनापतीसारखे कायम रणमैदानात असायचे. तर, उद्धव ठाकरे निवडणूक पर्यटनाच्या निमित्ताने आपल्या फोटोग्राफीच्या छंदाला वेळ देण्यासाठी बाहेर पडले आहेत. बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलने महाराष्ट्रात सारी समीकरणे बदलायची, उद्धव ठाकरे फार तर टीव्हीच्या रिमोटने चॅनेल बदलू शकतील, अशी कोपरखळी त्यांनी दिली आहे.

हेही वाचा – Lok Sabha : लोकसभा केवळ ट्रेलर, खरा पिक्चर विधानसभेत दिसेल; जानकरांचा महायुतीला इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -