Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious krishna janmashtami 2023 : कृष्णाच्या 'या' महामंत्राचा जप केल्याने लाभते मन:शांती

krishna janmashtami 2023 : कृष्णाच्या ‘या’ महामंत्राचा जप केल्याने लाभते मन:शांती

Subscribe

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी साजरी केली जाते. यंदा कृष्णाष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेकजण श्री कृष्णाची मनोभावे पूजा-आराधना करतात. पूजेसोबतच देवाच्या मंत्राचा जप करणं देखील तितकचं महत्वाचं आहे. या दिवशी श्री कृष्णाच्या या महामंत्राचा जप केल्याने श्री कृष्णाचे आशिर्वाद प्राप्त होतात.

श्रीकृष्णांच्या ‘या’ महामंत्राने मन होते शांत

Shri Krishna| पूजा में गंगाजल | Krishna Puja | why gangajal is not used in krishna puja | HerZindagi

श्री कृष्णाचा महामंत्र ‘हरे रामा हरे कृष्णा’

- Advertisement -

श्रींकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ‘हरे कृष्ण हरे राम’ या महामंत्राचा जप करावा. असे मानले जाते की, या मंत्राचा जप केल्याने केवळ देवाशीच नव्हे तर स्वतःशी देखील जोडण्यास मदत होते. या मंत्राचा जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते.

या मंत्राचे फायदे

  • मनावर नियंत्रण
- Advertisement -

भगवद्गीतेमध्ये असे म्हटले आहे की जर एखाद्याचे मन त्याच्या नियंत्रणाबाहेर असेल तर तो स्वतःचा शत्रू होतो. अशा स्थितीत हरे कृष्ण हरे राम मंत्राचा जप केल्याने माणसाला त्याच्या मनावर नियंत्रण मिळवता येते आणि मनाला शांती मिळते. तसेच यामुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळते.

  • मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो

असं म्हणतात की, या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. मृत्यूनंतर जीवन-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हावे, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. अशा स्थितीत जे भक्त या मंत्राचा जप करतात त्याचा देवाशी असलेला हा संबंध त्याला मोक्षाकडे घेऊन जातो.

 


हेही वाचा :

krishna janmashtami 2023 : प्रेम विवाहासाठी कृष्णाष्टमीला करा ‘या’ प्रभावशाली मंत्राचा जप

- Advertisment -

Manini