Tuesday, May 14, 2024
घरमानिनीReligiousShravan 2023 : श्रावणात करा 'या' पांढऱ्या वस्तूंचे दान; महादेव होतील प्रसन्न

Shravan 2023 : श्रावणात करा ‘या’ पांढऱ्या वस्तूंचे दान; महादेव होतील प्रसन्न

Subscribe

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेकजण भगवान शंकरांची पूजा-आराधना करतात. त्यांचे ग्रंथ, मंत्रांचा जप करतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी अनेकजण आवर्जून उपवास करतात. तसेच अनेक भाविक या काळात शिवमंदिरात जातात. श्रावणात महादेवांच्या आराधनेसोबतच दान-धर्म करणं देखील शुभ मानलं जात.

श्रावणात करा ‘या’ पांढऱ्या वस्तूंचे दान

- Advertisement -

शास्त्रानुसार, महादेवांना पांढऱ्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत. ज्योतिष शास्त्रात दूध, दही, साखर, तांदूळ या पांढऱ्या वस्तूंना चंद्राशी संबंधित मानले जाते. चंद्र ग्रह महादेवांच्या मस्तकावर विराजमान आहे. त्यामुळे तो महादेवांना अत्यंत प्रिय आहे. सोमवारच्या दिवशी चंद्राशी संबंधित या पांढर्‍या वस्तूंचा शिवलिंगावर अभिषेक केल्यास महादेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

  • दूध

सोमवारी कच्च्या दुधाने शिवपिंडीवर अभिषेक केल्याने घरातील कलह दूर होतात. कुटुंबात शांतता नांदते. मानसिक तणाव दूर होतो.

- Advertisement -
  • दही

श्रावण सोमवारी शिवपिंडीवर दह्याचे दान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आयुष्यात सुख समृद्धी येईल.

  • साखर

श्रावण सोमवारी शिवपिंडीवर साखर अर्पण केल्याने बुद्धी, एकाग्रता वाढते. तसेच यामुळे आयुष्यात गोडवा निर्माण होतो.

  • तांदूळ

सोमवारी शिवपिंडीवर अखंड तांदूळ अर्पण केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहिल.

 


हेही वाचा : Shravan 2023 : श्रावणात करा ‘या’ गोष्टींचे दान; होतील सर्व दोष दूर

- Advertisment -

Manini