Monday, April 22, 2024
घरमानिनीReligiousकाशी विश्वनाथाच्या मंदिरापासून काही अंतरावर आहे हे स्वंयभू ज्योतिर्लिंग

काशी विश्वनाथाच्या मंदिरापासून काही अंतरावर आहे हे स्वंयभू ज्योतिर्लिंग

Subscribe

हिंदू धर्मात देवी-देवतांना अत्यंत पूजनीय आणि पवित्र मानले जाते. संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात भगवान शंकरांची पूजा-आराधना केली जाते. तसेच महादेव भक्त त्यांच्या विविध तीर्थस्थानांना आवर्जून भेट देतात. त्यातीलच एक म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर, काशी विश्वनाथ मंदिराला भारतातील तिर्थ क्षेत्रांपैकी मुख्य मानले जाते. याचं मंदिरापासून काही अंतरावर आणखी एक शिव मंदिर आहे. जिथे ज्योतिर्लिंग स्वयं प्रकट झालेले आहे. या ज्योतिर्लिंगाला १०८ ज्योतिर्लिंगापैंकी एक मानले जाते. काशी विश्वनाथ मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिरात अनेक भक्त दर्शनासाठी येतात. सुल्तानपूरमधील या प्राचीन मंदिरामध्ये भगवान शंकरांच्या दर्शनासाठी वर्षभर लांबून भक्त येतात.

सुल्तानपूरमध्ये ४०० वर्ष जूनं मंदिर

Kashi Vishwanath: Varanasi's Sacred Jyotirling | Amar Granth

- Advertisement -

काशी विश्वनाथ मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या सुल्तानपूरमधील हे मंदिर ४०० वर्ष जूनं मंदिर आहे. या मंदिराला भारतातील १०८ ज्योतिर्लिंगापैंकी एक मानले जाते. या मंदिरातील ज्योतिर्लिंग स्वंयभू आहे.असं सांगण्यात येतं की, या मंदिरात जो कोणी मनापासून अभिषेक आणि पूजा करतो, त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळेच इथे अनेकजण दर्शनासाठी येतात.

श्रावणात भाविकांची होते गर्दी

खरंतर, इथे पूर्ण वर्ष भक्तांची गर्दी असते. मात्र श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. श्रावणात लोक जलाभिषेक करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात.


हेही वाचा : दुपारी मंदिरात का जाऊ नये?

- Advertisment -

Manini