घरमनोरंजनअदिती राव हैदरीने सिद्धार्थसोबत गुपचूप केलं लग्न

अदिती राव हैदरीने सिद्धार्थसोबत गुपचूप केलं लग्न

Subscribe

बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. मराठीसह बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी कपल्सने लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता सिद्धार्थ याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी प्रियकर सिद्धार्थसोबत (Siddharth) विवाहबंधनात अडकली आहे. तेलंगणामधील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम येथील श्री रंगनायकस्वामी मंदिरात या दोघांनी विवाह केला (Siddharth Aditi Rao Hydari  Wedding)  या विवाह सोहळ्यात कुटुंबीय आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता.असं वृत्त ‘ग्रेट आंध्र’ने दिलं आहे.

अदिती व सिद्धार्थने अद्याप लग्नाची माहिती दिली नसली, तरी लवकरच ते फोटो शेअर करतील, असं म्हटलं जात आहे. अद्याप या दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. तसेच त्यांच्या लग्नाचे फोटो अथवा व्हिडीओ समोर आलेले नाहीत. पण त्यांनी खासगी समारंभात साधेपणाने लग्न केल्याच्या चर्चा होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

- Advertisement -

 दोघेही अनेकदा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. सिद्धार्थ आणि अदिती हे 2021 मध्ये तामिळ-तेलुगू भाषेतील चित्रपट ‘महा समुद्रम’च्या सेटवर भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली.  चंदीगडमध्ये बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नालाही त्यांनी सोबत हजेरी लावली होती. ते शरवानंदच्या लग्नाला एकत्र गेले होते. त्या दोघांनी नात्याची जाहीरपणे कबुली दिलेली नव्हती, पण ते अनेकदा शहरात एकत्र फिरताना दिसायचे.

आदितीचे किंवा सिद्धार्थचे पहिले लग्न नाही. सिद्धार्थने 2003 मध्ये मेघना नारायणसोबत पहिले लग्न केले होते, मात्र 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आदितीबद्दल बोलायचे झाले तर ती इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच सत्यदीप मिश्राची पत्नी बनली होती. 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि 2013 मध्ये दोघे वेगळे झाले. आता या जोडप्याने लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. पण सिद्धार्थ किंवा अदितीने या वृत्ताला दुजोरा दिल्यानंतरच त्यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -