Sunday, June 11, 2023
घर मानिनी Religious Vastu Tips : पूजेमध्ये का गरजेचा आहे शंख? जाणून घ्या प्रकार आणि फायदे

Vastu Tips : पूजेमध्ये का गरजेचा आहे शंख? जाणून घ्या प्रकार आणि फायदे

Subscribe

हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या पूजेला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. फक्त देवी-देवताच नाहीत तर शंख, घंटा, डमरु यांसारख्या वाद्यांची देखील पूजा केली जाते. हिंदू धर्मातील प्रत्येक घरात शंखाची आवर्जून पूजा केली जाते. कोणतेही शुभ कार्य सुरु होण्यापूर्वी शंख नाद केला जातो. मात्र, यामागे नक्की काय कारण आहे. शंखाची पूजा का केली जाते? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

समुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नांमध्ये शंखाचे देखील समावेश आहे. त्यामुळे पूजेमध्ये देखील शंखाला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. अनेक देवी-देवतांनी शंख आपल्या हातामध्ये धारण केला आहे. फक्त हिंदू धर्मातच नव्हे तर जैन, बौद्ध धर्मामध्ये देखील शंखाला शुभ मानलं जातं. श्री विष्णूंना आणि लक्ष्मीला देखील शंख अधिक प्रिय आहे.

- Advertisement -

पूजेमध्ये का गरजेचा आहे शंख?
प्राचीन काळापासून ऋषी-मुनी आपल्या पूजेमध्ये शंखाचा वापर करतात. शुभ कार्याच्या सुरुवाताली शंख नाद केल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडते.

Pooja Samangal Kadai: HOW TO KEEP SHANKH IN POOJA ROOM

- Advertisement -

समुद्र मंथनावेळी जेव्हा शंख समुद्रातून बाहेर आला त्यावेळी देवी लक्ष्मींची देखील उत्पत्ती झाली. त्यामुळे शंखाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. मान्यतेनुसार, ज्या घरामध्ये शंख असतो. तिथे सदैव देवी लक्ष्मी वास करतात.

शंखाचे दोन प्रकार
शंख विविध प्रकारचे असतात. त्यातील दोन महत्वाचे आहेत. दक्षिणावर्ती आणि वामावर्ती असे शंखाचे दोन प्रकार आहेत. यातील दक्षिणावर्ती शंख वाजवता येत नाही कारण याचे मुख(तोंड) बंद असते. तसेच वामावर्ती शंख डाव्या बाजूने उघडा असतो. त्यामुळे हा वाजवता येतो. शंख नाद केल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

शंख वाजविण्याचे आणि ऐकल्याचे वैज्ञानिक फायदे

The Indian Female Blows Shankh At The Durga Puja Stock Video | Knot9शंख दररोज वाजविल्याने आणि ऐकल्याने आरोग्यासंबंधित अनेक फायदे मिळतात. यामुळे हृदयरोग देखील टळू शकतो. तसेच दमा, खोकला असे अनेक आजार देखील बरे होतात.

 


हेही वाचा :

Vastu Tips : घरामध्ये 2023 चे नवे कॅलेंडर लावण्यापूर्वी जाणून घ्या, ‘या’ महत्वाच्या गोष्टी

- Advertisment -

Manini