वैशाख महिन्याची पौर्णिमा हिंदू धर्मियांसोबतच बौद्ध धर्मियांसाठी देखील खास मानली जाते. कारण या दिवशी गौतम बुद्धांची जयंती साजरी केली जाते. या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा देखील म्हटलं जातं. यंदा 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. तसेच या दिवशी चंद्रग्रहण देखील असणार आहे. ज्यामुळे या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा खास संयोग या दिवशी पाहायला मिळणार आहे.
वैशाख पौर्णिमा तिथी
वैशाख पौर्णिमा 4 मे रोजी रात्री 11:44 वाजता सुरु होणार असून 5 मे रात्री 11:03 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 5 मे रोजी पौर्णिमा साजरी केली जाईल. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.51 ते दुपारी 12:45 पर्यंत आहे.
वैशाख पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय
- पौर्णिमेच्या दिवशी स्नान-दानाचे विशेष महत्त्व आहे. यासोबतच या दिवशी चंद्रग्रहणही होत आहे. पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते. यामुळे माणसाच्या घरात सुख-समृद्धी राहते.
- या दिवशी कोणत्याही नदीत जाऊन स्नान करावे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे शुभ मानले जाते. यामुळे मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
- घरामध्ये शक्य असल्यास सत्यनारायणाची पूजा करावी आणि कथेचे वाचन करावे.
- श्री विष्णूंसोबत या दिवशी देवी लक्ष्मी आणि चंद्राची देखील पूजा करावी.
- लक्ष्मीच्या मंत्राचे तसेच श्री सूक्ताचे पठण करावे आणि खीरीचा नैवेद्य अर्पण करावा.
- या दिवशी गरजू व्यक्तीला दान केल्यास देखील पुण्य मिळते.
हेही वाचा :