LIVE UPDATES: ‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या सेटवर कोरोना रुग्ण!

LIVE UPDATES: ‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या सेटवर कोरोना रुग्ण!
‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या सेटवर सात जणांना कोरोना निदान झाले आहे.

मिठीबाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समोर येत आहे.


मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ५२६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ५० हजार ९५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ७ हजार ७६१वर रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात सध्या कोरोनाबाधित आकड्यांमध्ये विक्रमी वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात सर्वाधिक १८ हजार १०५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ४३ हजार ८४४वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत २५ हजार ५८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


गोव्यात आज ७१३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ३५५वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १४ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ४ हजार ७८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


राज्यभरातील सामाजिक चळवळीत सक्रीय असलेले पथनाट्यकार जॉल्डन दालमेत यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते. वसईतील पर्यावरण आणि अन्य सामाजिक चळवळीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्यामागे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. वसईतील भुईगावचा हिरा गमावला अशा शब्दात फादर बॅप्टीस्ट लोपीस आणि फादर ज्यो आल्मेडा यांनी श्रध्दांजली अर्पण केली.


सुशांतने त्याला झोप येत नाही, कशामध्ये रस वाटत नाही, भूक लागत नाही. त्याला जीवन जगण्यात काहीही अर्थ वाटत नसून सतत भीती वाटते ही लक्षणे सांगितल्याचा जबाब डॉ. कर्सी चावडांचा समोर आला आहे. सुशांतला डिप्रेशन आणि एनजायटीचा आजार होता असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच सुशांतला जगावसं वाटत नव्हतं, असं देखील चावड म्हणाल्या.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये अचानक दौरा केला आहे. यावेळी त्यांनी महापालिकेत जाऊन कोरोनाचा परिस्थितीचा आढावा घेतला.


गेल्या तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात कोरोना Active प्रकरणांमध्ये ७ टक्के घट झाली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.


महाड-दुर्घटनाग्रस्त मुख्य आरोपी बिल्डर फारुख काझी पोलिसांच्या ताब्यात


‘बदल्या या राज्याच्या हिताच्या’, संजय राऊतांचे विरोधकांना उत्तर

गेले काही दिवस चर्चेत असलेल्या पोलीस खात्यातील बदल्यांना अखेर बुधवारी मुहूर्त मिळाला आणि ४५ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. याबात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी ‘बदल्या या महाराष्ट्र राज्याच्या हिताच्या’, असल्याचे म्हणत विरोधकांना उत्तर दिले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बदल्यांचा धंदा करतंय असा, आरोप केला आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘नवीन सरकार आल्यानंतर बदल्या करु नये, असे घटनेत लिहिले आहे का? बदल्या करु नका असे कोणत्या कायद्याच्या पुस्तकात लिहिले आहे. तुमच्या लोकांनाच वर्षानुवर्ष ठेवून राज्य करावे का? बदल्या काय फक्त आम्हीच केल्या का? बदल्या करुन आम्ही काय नवीन चमत्कार केला का? मनमोहन सिंग यांचे सरकार जाऊन मोदींचे सरकार आले तेव्हा बदल्या केल्या नाही का? बदल्या राज्याच्या हिताच्या आहेत आणि तो करण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकारला आहे’. सामना कार्यालयात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. (सविस्तर वाचा)


आज Supreme Court मध्ये सुनावणी!

देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना गृहकर्जामध्ये थोडा दिलासा मिळावा यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Loan Emi Moratorium चा पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र, त्याची आधी ३ महिने आणि नंतर ३ महिने अशी एकूण ६ महिन्यांची मुदत ३१ ऑगस्ट रोजीच संपली आहे. त्यामुळे आता पुढे हफ्ते भरावे लागणार या चिंतेमध्ये सर्वसामान्य कर्जदार आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून यासंदर्भात आजच निर्णय येण्याची शक्यता आहे. Moratorium ची सुविधा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात यावी आणि या कालावधीसाठी व्याजाची वसूली केली जाऊ नये, या दोन प्रमुख मागण्या याचिकाकर्त्यांनी केल्या असून RBI चा तसं करण्यास नकार आहे. (सविस्तर वाचा)


‘भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरुच, मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का?’

‘सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे. ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?’, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासंबंधी विचारणा केली आहे. (सविस्तर वाचा)


अमेरिकेत ‘या’ महिन्यात उपलब्ध होणार Covid-19 ची लस

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असताना तो रोखण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. मात्र, ही कोरोना लस विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटितपणे जे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसला रोखणारी लस विकसित करण्यासाठी अमेरिकेत युद्धपातळीवर संशोधन सुरु आहे. तर अमेरिकेत चार ते पाच कंपन्यांच्या लसी मानवी परीक्षणाच्या वेगवगेळया टप्प्यांवर असल्याचे सांगितले जात आहे. (सविस्तर वाचा)


माथेफिरु मुलाकडून आईची हत्या

काही महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्यात एका दारुड्या मुलाने आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडल्याचे समोर आले आहे. एका माथेफिरु मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. (सविस्तर वाचा)


दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात ८३ हजारहून अधिक जणांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. तर १ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या ३८ लाखांवर गेली आहे. तर ६७ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळं निधन

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे (८४) यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान कोरोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू आहे.


पंतप्रधान मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे. हॅकरने नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेलं ट्विटर अकाऊंट हॅक केले आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून हॅकरने थेट बिटक्वाइन देण्याची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. मात्र हॅकरने हे ट्विट नंतर लगेच डिलीट केल्याचे समजतेय. (सविस्तर वाचा)


विश्वास नांगरे-पाटील मुंबईच्या सहआयुक्तपदी

गेले काही दिवस चर्चेत असलेल्या पोलीस खात्यातील बदल्यांना अखेर बुधवारी मुहूर्त मिळाला असून ४५ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेष म्हणजे नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बिपिन कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीणमधून स्वतंत्र काढण्यात आलेल्या मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी परखड आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या सदानंद दाते यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वस नांगरे-पाटील यांची बदली झाली आहे. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदल्याच्या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर गृहविभागाने ही यादी जाहीर केली होती. (सविस्तर वाचा)


भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी शोधली सर्वात दूरची आकाशगंगा

भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी विश्वातल्या सर्वात दूरच्या आकाशगंगेचा शोध लावला असून अंतराळ शोध क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. भारताची ‘मल्टी-वेव्हलेंथ स्पेस’वेधशाळा- ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ने पृथ्वीपासून 9.3 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या आकाशगंगेमधून अति-अतिनील किरणे सापडली आहेत. ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ म्हणजेच आयुका या पुण्याच्या संस्थेच्या एका शास्त्रज्ञांच्या पथकाने डॉ. कनक साहा यांच्या नेतृत्वाखाली या आकाशगंगेचा शोध लावला आहे. (सविस्तर वाचा)


अंतिम वर्षाची परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्यास राज्यपाल कोश्यारी अनुकूल

राज्यात अंतिम वर्षाची परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षेसंदर्भात बुधवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल यांच्याशी भेट घेतली. मागील दोन ते तीन दिवसांपासून अंतिम वर्ष परीक्षेबाबत कुलगुरूंच्या बैठकासंबंधीची माहिती बैठकीत उदय सामंत यांनी राज्यपालांना दिली. परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने नेमकी काय तयारी केलेली आहे? सोबतच परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची काय भावना आहे? त्याबाबत सुद्धा राज्यपाल यांना माहिती दिली आहे. गुरुवारी पुन्हा एकदा कुलगुरू-राज्यपाल आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची बैठक होईल. (सविस्तर वाचा)

First Published on: September 3, 2020 11:31 PM
Exit mobile version