घरCORONA UPDATEअमेरिकेत ‘या’ महिन्यात उपलब्ध होणार Covid-19 ची लस

अमेरिकेत ‘या’ महिन्यात उपलब्ध होणार Covid-19 ची लस

Subscribe

वर्षअखेरपर्यंत कोरोनावरील लस बाजारात आणण्याचे अमेरिकेचे लक्ष्य

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असताना तो रोखण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. मात्र, ही कोरोना लस विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटितपणे जे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसला रोखणारी लस विकसित करण्यासाठी अमेरिकेत युद्धपातळीवर संशोधन सुरु आहे. तर अमेरिकेत चार ते पाच कंपन्यांच्या लसी मानवी परीक्षणाच्या वेगवगेळया टप्प्यांवर असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉर्डना कंपनीची लस सर्वात आघाडीवर आहे. मॉर्डनाची लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात असून अमेरिकेत ३० हजार नागरिकांवर मॉर्डनाच्या लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच्या लसीचीही तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु झाली आहे.

- Advertisement -

मॉर्डनाची लस इतर वयोगटाप्रमाणे वयोवृद्धांवरही प्रभावी ठरली असून या लसीचा डोस दिल्यानंतर वयोवृद्धामध्येही कोरोना व्हायरसचा खात्मा करणाऱ्या अँटीबॉडीजची निर्मिती झाल्याचे समोर आले. अमेरिकेत सहा ते सात कंपन्या कोरोनापासून मानवी जीवन सुरक्षित करणाऱ्या लसीची निर्मिती करत आहेत. मात्र रशियाप्रमाणे अमेरिकेने अजून कुठल्याही लसीच्या वापराला अंतिम मंजुरी दिलेली नाही. पण लस वितरणाची तयारी अमेरिकेने आतापासून सुरु केली आहे.

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन नागरिकांसाठी दिलासा देणारी एक मोठी बातमी आहे. अमेरिकेने राज्यांना १ नोव्हेंबरपासून लस वितरणासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील राज्यांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी म्हणजे १ नोव्हेंबरला लस वितरणासाठी तयार राहा, असे सांगितले आहे. अमेरिकेत ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होईल. मॉर्डना पाठोपाठ अमेरिकेत नोव्हाव्हॅक्स लस निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. नोव्हाव्हॅक्सने कोरोना व्हायरस विरोधात लस विकसित केली असून या लसीच्या सध्या मानवी चाचण्या देखील सुरु आहेत.

- Advertisement -

कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून अमेरिकेत लाखो लोक कोरोनाबाधित तर व्हायरसची लागण होऊन मोठया प्रमाणावर अमेरिकेत कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा आकडा आहे. याकरता वर्षअखेरपर्यंत कोरोनावरील लस बाजारात आणण्याचे अमेरिकेने लक्ष्य ठेवले होते. त्यात अमेरिका नक्की यशस्वी होईल असे सध्या चित्र दिसतंय.


कोरोनाची लस विकसित करण्यासाठी जगाला मदत करण्यास अमेरिकेचा नकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -