घरमहाराष्ट्रविश्वास नांगरे-पाटील मुंबईच्या सहआयुक्तपदी,दीपक पांडे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त

विश्वास नांगरे-पाटील मुंबईच्या सहआयुक्तपदी,दीपक पांडे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त

Subscribe

गेले काही दिवस चर्चेत असलेल्या पोलीस खात्यातील बदल्यांना अखेर बुधवारी मुहूर्त मिळाला असून ४५ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेष म्हणजे नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बिपिन कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे ग्रामीण व पालघर ग्रामीणमधून स्वतंत्र काढण्यात आलेल्या मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी परखड आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या सदानंद दाते यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वस नांगरे-पाटील यांची बदली झाली आहे. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदल्याच्या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर गृहविभागाने ही यादी जाहीर केली होती.

अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांची अप्पर पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था, पोलीस महासंचालक कार्यालय, लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांची नागपूर शहर पोलीस आयुक्त, रेल्वेचे अप्पर पोलीस महासंचालक जयजीत सिंह यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक, मुंबई शहर कायदा व सुव्यस्थेचे सहपोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक, केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आलेले सदानंद दाते यांची मिरा-भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्तपदी, नागपूरचे पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांची पोलीस महासंचालक कार्यालयातील वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांची प्रशिक्षण व खास पथक, पोलीस महासंचालक कार्यालयाच्या अप्पर पोलीस महासंचालक, लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक बिपीनकुमार सिंह यांची नवी मुंबई पोलीस आयुक्त, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक डॉ. जय जाधव यांची नवी मुंबई सहपोलीस आयुक्त, दक्षता विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड, राज्य राखीव दलाचे समादेशक चंद्रकिशोर मिना यांची अमरावती विशेष पोलीस महानिरीक्षक, विक्रीकर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय दराडे यांची पूर्व विभाग अतिरिक्त पोलीस आयुक्त मुंबई शहर, मध्य विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संगणकल विरेश प्रभू यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, व्हीआयपी सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक सत्यनारायण यांची दक्षिण विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, संरक्षण आणि सुरक्षा विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची मध्य विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, जालना पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नामदेव चव्हाण यांची उत्तर विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक आरती सिंग यांची अमरावती शहर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, नागपूर शहर उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. एच महावरकर यांची पोलीस महानिरीक्षक व दक्षता अधिकारी-सिडको, पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लख्मी गौतम यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक, मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांची अप्पर पोलीस आयुक्त सशस्त्र विभाग, सशस्त्र पोलीस विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप पाटील यांची मिरा-भाईंदर-वसई-विरारच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, सागरी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची सहपोलीस आयुक्त वाहतूक विभाग-मुंबई, वाहतुक विभागाचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची विशेष सागरी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा विभाग, सुधार सेवेचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिपक शिवानंद पांडे यांची नाशिक शहर पोलीस आयुक्त, नवी मुंबई सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांची मुंबई शहराच्या प्रशासन विभागाच्या सहपोलीस आयुक्त, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक-सुधार सेवा, महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगावकर, एटीएसचे अप्पर पोलीस महासंचालक देवेन भारती, अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक एम. एस रानाडे, दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निशिथ मिश्रा, पुण्याचे उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, अमरावतीचे पोलीस आयुक्त संजयकुमार बावीस्कर, पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबाडे यांच्या बदलीचे आदेश नंतर काढण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -