घरदेश-विदेशपंतप्रधान मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक; हॅकरने केली बिटकॉइनची मागणी

पंतप्रधान मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक; हॅकरने केली बिटकॉइनची मागणी

Subscribe

हे अकाऊंट त्याच्या वैयक्तिक वेबसाइटवर जोडले गेले होते. या अकाऊंटवर त्यांचे २५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे. हॅकरने नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेलं ट्विटर अकाऊंट हॅक केले आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून हॅकरने थेट बिटक्वाइन देण्याची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. मात्र हॅकरने हे ट्विट नंतर लगेच डिलीट केल्याचे समजतेय.

- Advertisement -

 

हे अकाऊंट त्याच्या वैयक्तिक वेबसाइटवर जोडले गेले होते. या अकाऊंटवर त्यांचे २५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

- Advertisement -

अशी होती हॅकर्सची मागणी

हॅकर्सनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘कोविड -१९ साठी पीएम मोदी रिलीफ फंडामध्ये दान द्यावे, असे मी आपणास विनंती करतो’. पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवर बरेच ट्विट केले गेले. सर्व ट्विटमध्ये पैसे देण्याची मागणी होत होती. वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना ट्विटरनेही पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटला अकाऊंट लिंक केले असून नोंदणीकृत असल्याची कबुली दिली आहे.

पेटीएम मॉलच्या डेटा चोरीत जॉन विक ग्रुपचे नाव आले होते. जॉन विक ग्रुपने पेटीएम मॉलचा डेटा चोरी केला होता, असा दावा सायबर सेक्युरिटी फर्म सायबलने ३० ऑगस्टला केला होता. या हॅकर ग्रुपने खंडणीची मागणी केल्याचा दावाही सायबलने केला होता. मात्र, पेटीएमने हा दावा फेटाळून लावला होता. आमच्या डेटाची चोरी झाल्याची घटना घडलेली नसल्याचे पेटीएमने स्पष्ट केले होते.

जाणून घ्या, बिटकॉइन म्हणजे काय?

बिटकॉइनची सुरुवात २००९ मध्ये झाली होती. बिटकॉइनची किंमत सतत वाढत आहे. आज याची किंमत १० लाखांच्या पुढे गेली आहे. ही एक प्रकारची डिजिटल करंसी आहे. बिटकॉइनची सुरुवात एलियस सतोशी नावाच्या एका व्यक्तीन केली होती. भारतात देखील गुप्तपणे बिटकॉइन ट्रेडिंग केली जाते. मात्र, सरकारने याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. बिटकॉइन ट्रेडिंग डिजिटल वॉलेटद्वारे होते.


राज्याच्या पोलीस दलात मोठी उलथापालथ; अनेक अधिकाऱ्यांची खांदेपालट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -