HERO, हे फक्त चार शब्द नाहीत – सचिन तेंडुलकर

HERO, हे फक्त चार शब्द नाहीत –  सचिन तेंडुलकर

HERO, हे फक्त चार शब्द नाहीत - सचिन तेंडुलकर

पाकिस्तानी एफ-१६ विमानाच्या हवेत चिंधड्या उडवणारा भारताचा ढाण्या वाघ भारतीय मिग-२१ विमानाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास वाघा बॉर्डरवरून रुबाबात मायदेशी परतले आहेत. भारताच्या या वीरपुत्राचे स्वागत करण्यासाठी दुपारपासूनच तेथे जमलेल्या भारतीयांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात स्वागत केले. भारतात परतलेल्या या वाघाचे साऱ्यांकडून जोरदार स्वागत आणि कौतुक होत असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अन्य खेळाडूंनीही ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. तसेच बीसीसीआयसह सेहवाग, गंभीर, रैना, अश्विन यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘HERO, हे फक्त चार शब्द नाहीत. या चार शब्दांपेक्षा HERO फार मोठा असतो. हिरो तो असतो जो तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवतो. #WelcomeHomeAbhinandan Jai Hind’

अभिनंदन ६० तासांनी भारतात परतले

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान शुक्रवारी अखेर ६० तासांनी भारतात सुखरुप परतले आहेत. अभिनंदन यांनी दाकवलेल्या शौर्याचा अभिमान सर्वच भारतीयांना आहे. शुक्रवारी रात्री सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान यांना वाघा बॉर्डरहून भारताच्या स्वाधिन केले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज होता. अनेक माध्यमातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेंही अभिनंदनचे कौतुक केले आहे.

पाकचे शेपूट वाकडेच

अभिनंदन यांना पाकिस्तान दुपारी साडेतीनच्या सुमारास भारताच्या ताब्यात देणार होता. मात्र तोपर्यंत त्यांना बॉर्डरवर आणलेच नाही. उलट जगाला आपले कथित औदार्य दाखवण्यासाठी पाकिस्तानकडून अभिनंदन यांना सोडत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यातून आपण किती क्षमाशील आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्नही झाला. मात्र भारताकडून विचारणा केल्यावर अजून कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे खोटे कारण देण्यात आले आणि अखेर रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी अभिनंदन यांना भारतात पाठवण्यात आले.


हेही वाचा – वर्लडकपला खेळाडू घालणार अभिनंदन यांच्या नावाची जर्सी

हेही वाचा – अभिनंदन यांच्यासोबतच्या ‘या’ महिला कोण? घ्या जाणून


 

First Published on: March 2, 2019 4:56 PM
Exit mobile version