घरमनोरंजन'अभिनंदन'च्या शौर्यावर आधारीत चित्रपट बनवण्यास निर्माते उत्सुक

‘अभिनंदन’च्या शौर्यावर आधारीत चित्रपट बनवण्यास निर्माते उत्सुक

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि भारतीय वायुदलाच्या एअर स्ट्राइकवर चित्रपट काढण्यास निर्मात्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

भारताच्या काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेला भ्याड हल्ला, त्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देताना केलेलं एअर स्ट्राइक. तसेच मिग २१ विमान कोसळल्याने पाकिस्तानच्या ताब्यात अडकलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या शौर्याची गाथा सांगणारा चित्रपट, मालिका किंवा वेबसीरिज काढण्यास निर्मात्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. महत्वाचं म्हणजे भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान भारतात येण्याच्या आधीच निर्मात्यांनी या विषयावर चित्रपट बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

पाच संस्थानी केली नोंद

पुलवामा हल्ल्याचा बदला घेताना भारताने २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइक करत पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ले केले. त्यानंतर लगेच मुंबईच्या अंधेरी येथील इंडियन पिक्चर्स प्रॉड्युसर्स असोसिएशनच्या (IMPPA) कार्यालयात जवळपास पाच प्रॉडक्शन हाऊसचे निर्माते या विषयासंबंधीत चित्रपटाच्या शीर्षकाची नोंदणी करण्यासाठी जमले होते. भारताने याआधी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर भाष्य करणारा उरी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. बॉक्स आफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत २०० कोटींपेक्षा जास्त गल्ला कमवला आहे. प्रेक्षकांचा देशभक्ती आणि वास्तवदर्शी चित्रपटांकडचा कल बघता, आशा प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती आपल्या प्रोडक्शनच्या नावे करण्यास निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे.

- Advertisement -

या नावांची झाली नोंद

‘बालाकोट’, ‘सर्जिकल स्ट्राइक्स २.०’, ‘पुलवामा अटॅक्स’ यांसारख्या शीर्षकांची नाव पुढे आली आहेत. आतापर्यंत ‘पुलवामा’, ‘पुलवामा : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘वॉर रुम’, ‘हिंदुस्तान हमारा है’, ‘पुलवामा टेरर अटॅक’, ‘द अटॅक्स ऑफ पुलवामा’, ‘ATS- वन मॅन शो’ या नावांची नोंदणी झाली आहे. दरम्यान निर्मात्यांची घाईगडबड आणि चढाओढ होत असतानाची माहिती त्यावेळी (IMPPA) च्या कार्यालयात त्यावेळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दिली आहे. त्यामुळे लवकरच अभिनंदनची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार, असं म्हणायला हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -